आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय येथील अद्ययावत डायलेसिस व अपघात विभागाचा लोकार्पण
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:आ.महेंद्र दळवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय येथील अद्ययावत डायलेसिस व अपघात विभागाचा लोकार्पण सोहळा दि.०३.१२.२०२४ रोजी संपन्न झाला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने राजा केणी, हर्शल पाटील, शैलेश चव्हाण, अशरफ घट्टे , सारिका शिंदे,संपदा माळी, मनोहर पाटील, ऍड.मनमीत पाटील तसेच जिल्हा रुग्णालयातील अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शीतल जोशी-घुगे, कान,नाक,घसा तज्ञ वर्ग-१ डॉ.निशिकांत पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ.संगमेश्वर महाजन इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.
आ.महेंद्र दळवी यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस व अपघात विभाग अद्ययावत करण्यात आला असुन आतापर्यंत डायलेसिस विभागात प्रती दिन ३ शिफ्ट मध्ये ७ मशिनच्या सहाय्याने ७४ रुग्ण उपचार घेत असून महिन्यामध्ये एकूण ६१८ डायलेसिस सत्र होत आहेत. परंतु आता त्यामध्ये आणखी ५ मशीनची वाढ झाल्यामुळे अधिकाधिक गरजू रुग्णांना याचा फायदा होणार आहे याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी आमदार महोदयाचे विशेष आभार व्यक्त केले.
डायलेसिस रुग्णांना बसविण्यात येणारा फिशुला व कॅथेटर बसविण्यासाठी मुंबई यथे जावे लागत होते याचा खर्च देखील ५० ते ६० हजार इतका रुग्णांना करावा लागत होता, परंतु आता जिल्हा रुग्णालयामध्ये या विषयाचे तज्ञ डॉ.अक्षय गुरसाळे हे प्रत्येक आठवड्यामध्ये येऊन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत सेवा देत आहेत त्यामुळे रुग्णांचा आर्थिक व शारीरिक त्रास कमी झालेला आहे त्यांचे माध्यमातून जिल्हा रुग्णालयातील १८ ते २० रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे.
आमदार महोदयांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून लवकरच ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे ५ बेडचे अद्ययावत डायलेसिस सेंटर सुरु केले जाणार आहे. याकरिता राज्य पातळीवर पाठपुरावा केलेला आहे. यामुळे अलिबाग, मुरुड रोहा येथील एकही गरजू रुग्ण डायलेसिस विना राहणार नाही तसेच प्रतीक्षेतही राहणार नाही.
जिल्हा रुग्णालय येथे बऱ्याच कालावधीपासून इमारत दुरुस्तीच्या कामामुळे २ बेडचा अपघात विभाग होता. परंतु जिल्हा रुग्णालयातील बेडच्या दृष्टीने अपघात विभाग मोठा असणे अपेक्षित असल्याने आमदार केलेल्या पाठपुराव्यामुळे अद्ययावत ५ बेडचा अपघात विभाग तयार करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये सर्व आधुनिक साधनसामुग्री उपलब्ध आहे तसेच अपघात विभागामध्ये २४ x ७ वैद्यकीय अधिकारी,अधिपरिचारिका व इतर स्टाफ कार्यरत असणार आहेत.
या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून आ. महेंद्र दळवी यांचे शुभ हस्ते .शाम नंदी, शिवाजीनगर ,अलिबाग , वृशेष म्हात्रे, भुते अलिबाग व श्रीम.गीता पांडुरंग म्हात्रे, गोठवणे उरण या दिव्यांग व्यक्तीना दिव्यांग प्रमाणपत्र व दिव्यांग साहित्याचे वितरण केले.
तसेच यापुढील कालावधीमध्ये लवकरच जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथे ३०० बेडचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्यात येईल व दीड वर्षामध्ये रुग्णालयाचा चेहरा मोहरा बदलण्यार असल्याचे मा.आमदार महोदयांनी मनोगत व्यक्त केले. याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी आमदार व राज्य शासनाचे शतशः आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी डायलेसिस व अपघात विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.