वेध अलिबाग २०२५” मध्ये आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, लेखक अरविंद जगताप, इत्यादि मान्यवरांचा सहभाग.*

88
वेध अलिबाग २०२५" मध्ये आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, लेखक अरविंद जगताप, इत्यादि मान्यवरांचा सहभाग.*

वेध अलिबाग २०२५” मध्ये आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, लेखक अरविंद जगताप, इत्यादि मान्यवरांचा सहभाग.*

वेध अलिबाग २०२५" मध्ये आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, लेखक अरविंद जगताप, इत्यादि मान्यवरांचा सहभाग.*

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:अलिबाग परिसरातील नवयुवक नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन करणार आहेत. विद्यासान एज्युकेशनल फाउंडेशन, अलिबाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH), ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आरसीएफ वसाहतीमध्ये दिनांक १९ जानेवारी २०२५ (रविवार) रोजी आयोजित वेध अलिबाग ‘रंग-उमंग’ या कार्यक्रमांतर्गत भूतपूर्व आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, “चला हवा येऊ द्या” चे पत्रलेखक अरविंद जगताप, मायक्रोसॉफ्टचे डायरेक्टर चिन्मय गवाणकर, एकल प्रवासी आभा चौबळ यांसह डिझाईन जत्रा या आगळया सामाजिक-स्थापत्य संस्थेच्या वास्तुविशारदांच्या मुलाखती विख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी घेणार आहेत.

डॉ आनंद नाडकर्णी यांची इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH) , ठाणे तर्फे महाराष्ट्रातील विविध शहरांत स्थानिक संस्थांच्या सहयोगाने वेध कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्वांच्या मुलाखती घेतल्या जातात. विद्यासान एज्युकेशनल फाउंडेशन, अलिबागच्या विद्यमाने गेल्या वर्षी प्रथमच वेध-अलिबागचे आयोजन करण्यात आले होते. गतवर्षी १४ जानेवारी रोजी आरसीएफ कम्युनिटी हॉल मध्ये झालेल्या वेध – घेऊ भरारी या वेधच्या कार्यक्रमात अंध व्यावसायिक सागर-नेत्रा पाटील, पर्यावरणस्नेही उद्योजिका अमिता देशपांडे, इंफ्ल्यूएन्सर रानमाणूस प्रसाद गावडे, लेकमॅन आनंद मल्लिगवड आणि ऑस्कर नामांकित आर्ट डायरेक्टर दिलीप मोरे यांच्या मुलाखती डॉ. आनंद नाडकर्णी यांनी घेतल्या होत्या. या मातब्बर व्यक्तिमत्वांचा विलक्षण जीवनप्रवास त्यांच्याच तोंडून अनुभवताना अलिबागेतील शेकडो युवक युवती त्याचा लाभ घेतला होता.

वेध-अलिबाग २०२५ ची थिम आहे “रंग-उमंग”. विविध क्षेत्रातील आगळयावेगळ्या व्यक्तिमत्वांच्या जीवनप्रवासाचे रंग उलगडत असताना त्या व्यक्तींच्या यशस्वीतेमागची ऊर्जा, उत्साहाचे (उमंग) स्रोत डॉ. नाडकर्णी यांच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी अलिबाग परिसरातील नवयुवक वेध-अलिबाग २०२५ रंग-उमंग कार्यक्रमात पुन्हा एकदा सहभागी होण्यासाठी निश्चितच उत्सुक असतील. या कार्यक्रमदरम्यान डॉ. आनंद नाडकर्णी मिरा बोरवणकर , चिन्मय गवाणकर
,आभा चौबळ,अरविंद जगताप,व
डिझाईन जत्रा ही एक सामाजिक-स्थापत्य संस्था आहे. वास्तुविशारद विनिता कौर एम. चिरागिया, वास्तुविशारद प्रतीक धनमेर आणि वास्तुविशारद शार्दुल पाटील यांची मुलाखत घेतली जाणार आहे.

वेध-अलिबागच्या निमित्ताने एक नवे वैचारिक दालन अलिबाग मधील तरुण पिढीसाठी खुले होत आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनात मुख्य प्रायोजक म्हणून आरसीएफ लिमिटेडचे सर्वतोपरी सहाय्य लाभले आहे. आयुष्यची दिशा ठरविण्यासाठी प्रेरणा देणार्‍या, मार्गदर्शन करणार्‍या या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सामील होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यासान एज्युकेशनल फाउंडेशन, अलिबाग तर्फे करण्यात येत आहे. कार्यक्रमातील सहभागासाठी : ८६९८७९५७९६ (उमेश वाळंज) किंवा ९८५०९६५४५२ (अनिल आगाशे) यांच्याशी संपर्क साधावा.