“न्यायालयाचा आदेश धुडकावला? निर्दोष पोलीस कर्मचाऱ्यांवर अन्याय – सामान्यांचे काय?” रवींद्र राठोड यांचा आरोप.

954
"न्यायालयाचा आदेश धुडकावला? निर्दोष पोलीस कर्मचाऱ्यांवर अन्याय – सामान्यांचे काय?" रवींद्र राठोड यांचा आरोप.

“न्यायालयाचा आदेश धुडकावला? निर्दोष पोलीस कर्मचाऱ्यांवर अन्याय – सामान्यांचे काय?”
रवींद्र राठोड यांचा आरोप.

"न्यायालयाचा आदेश धुडकावला? निर्दोष पोलीस कर्मचाऱ्यांवर अन्याय – सामान्यांचे काय?" रवींद्र राठोड यांचा आरोप.

संदेश साळुंके
कार्जत रायगड प्रतिनिधी
संपर्क.: ९०१११९९३३३

कर्जत :- न्यायासाठी लढणाऱ्या दोन निर्दोष पोलीस कर्मचाऱ्यांच्या संघर्षाने प्रशासकीय व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि पक्षपातीपणा पुन्हा एकदा समोर आणला आहे. रवींद्र अंबू राठोड आणि प्रशांत कांबळे ह्यांना मा. न्यायालयाने निर्दोष ठरवलेले आहे. परंतु पोलीस अधिकारी यांच्या मुळे अद्याप सेवेत पुनःस्थापित झालेले नाहीत. न्यायालयाचा आदेश असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हा प्रश्न उपस्थित होत आहे. “जर पोलिसांवरच अन्याय होत असेल, तर सामान्य जनतेचे काय?”.काय आहे हे प्रकरण? :- नोट बंदीच्या काळात बडतर्फ पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड आणि प्रशांत कांबळे यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, तपासातील त्रुटींमुळे न्यायालयाने डिसेंबर 2023 मध्ये त्यांना निर्दोष ठरवले. मात्र याच खटल्यातील इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ पोलीस सेवेत पुन्हा रुजू करून घेतले गेले होते. निकाल लागूनही राठोड आणि कांबळे यांना ‘लवकरच बोलावण्यात येईल’ या शब्दांवर थांबवले जात आहे. यावर “आम्हाला न्यायालयाने निर्दोष ठरवलं, मग आम्हाला सेवेत परत कधी घेणार?” रवींद्र राठोड यांनी संतप्त स्वरात प्रशासनाला विनंती करीत आहेत.

प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी जितेंद्र बोडप्पा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, फिर्यादी सुरेंद्र लाभशंकर दडीया यांनी खोट्या पुराव्यांच्या आधारे आम्हाला यात अडकवलं. हे वैयक्तिक आकसातून झालं आहे. आम्ही निर्दोष असताना आम्हाला भूतकाळाच्या छायेत अडकवले जात आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवरच अन्याय होत असेल, तर सामान्य लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनतो. “आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवतो, तेच जर अन्यायग्रस्त असतील, तर आम्हाला कोण वाचवणार?”. खोट्या पुराव्यांच्या खेळीने आमचे आयुष्य उध्वस्त झाले आहे असे रवींद्र राठोड बोलले.

दोघांना सेवेत घेतले आहे व आम्हाला नाही त्या मुळे राठोड आणि कांबळे यांच्या कुटुंबीयांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. एका खोट्या आरोपामुळे आम्हाला समाजाकडून वेगळं पाहिलं जात आहे व त्यात आर्थिक व मानसिक असा वेगळाच त्रास सहन करावा लागत आहे, तत्काळ सेवा बहाली, खोट्या पुरावे सादर करणाऱ्या दोषींवर कारवाई आणि भरपाईची मागणी राठोड यांच्या पत्नी कडून करण्यात आली असून या प्रशासनाला जबाबदार धरण्याची वेळ आमच्यावर आली आहे असेही त्या म्हणाल्या.

या प्रकरणाने प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी आणि पक्षपातीपणा उघड केला आहे, असे राठोड कुटीबियांचे आरोप आहेत. त्या पुढे ते असे ही म्हणतात की न्यायालयाचा आदेश असूनही आम्हाला न्याय मिळत नसेल, तर सर्व सामान्य माणसासाठी परिस्थिती किती गंभीर असेल? असे विचार करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. आम्ही प्रचंड तणावांमध्ये आमचे जीवन कसेबसे जगत आहोत. न्याय मिळाला नाही, तर राठोड व कांबळेंसारख्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेसाठी ही हा लज्जास्पद पराभव ठरेल