कर्जतमध्ये पुन्हा आंदोलन सुरू होणार
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333
कर्जत :- कर्जत नगरपरिषद हद्दीतील नागरी समस्यांचे निराकरण करण्यात अपयश आल्यामुळे आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कर्जत शहर बचाव समितीने १६ डिसेंबर २०२४ पासून लोकमान्य टिळक चौकात बेमुदत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीने यापूर्वी २५ सप्टेंबर आणि २४ ऑक्टोबर २०२४ रोजी समस्यांवर उपाययोजनांसाठी निवेदने सादर केली होती, मात्र ठोस कृती न झाल्याने आंदोलनाचा इशारा दिला होता. समितीने प्रशासनाला कायदा-सुव्यवस्थेच्या बिघडण्यास जबाबदार धरले आहे.
कर्जत नगरपरिषद हद्दीत कर्जत शहर, मुद्रे, दहीवली, गुंडगे, भिसेगाव या परिसरात भौगोलिक आणि तांत्रिक दृष्ट्या वेगवेगळ्या समस्या आहेत. मात्र पाण्याची समस्या सर्वच भागात कॉमन बनली आहे. शहरातील वाहतूक कोंडीचा, आणि गलीच्छ कारभाराचा त्रास शहराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना सुद्धा होत आहे. या आणि अशा अनेक नागरी समस्या घेऊन नगरपरिषद प्रशासन विरोधात गेल्या काही महिन्यापासून लढा देत आहेत. समाधानकारक काम न झाल्यानेच कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने 16 डिसेंबर पासून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती ॲड.कैलास मोरे यांनी दिली आहे.