अखेर फरार डॉ. सागर काटे याला अटक;
सरकारी नोकरीला लावतो सांगून अनेकांना घातला होता गंडा
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
नेरळ:- आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणारे डॉ. सागर काटे याला अटक करण्यात आली असून ते नेरळ येथील रहिवासी आणि रायगड जिल्हा परिषदेमधील डॉ. या पदावर होते. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर मा. न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यासह सात जणांनी नोकरीचे आमिष दाखवून चार जणांना गंडा घातला आहे. त्यातील तीन जणांना रेल्वेत नोकरी लावतो म्हणून आणि एकाला मंत्रालयात ड्रॉयव्हर म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत.
नेरळ पोलीस ठाण्यात त्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात डॉ.सागर दत्तात्रय काटे यास अटक करण्यात आली असून रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सेवेत असलेले डॉ. सागर काटे यांनी त्या ठिकाणी देखील नोकरीचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली असल्याची चर्चा होती. २०२३ पासून काटे यांनी आपले सहकारी मुंबई येथील चिंतन हर्षददास शहा उर्फ चेतन मेहता, नवी मुंबई येथील राहुल उर्फ आशिष रामभाऊ वाघ, तसेच राजदीप उर्फ राहुल दीप उर्फ दीपक उर्फ दिपकदास, अमोल उर्फ प्रदीप निवेणकर विशाल वसंत निवरे आणि नवी मुंबई येथील सचिन हंबीर पाटील उर्फ शंभूदास यांनी डॉ.सागर काटे यांच्या माध्यमातून फसवणूक सुरु केली.
सागर काटे याच्यावर विश्वास ठेवून मध्य रेल्वे मध्ये बुकिंग क्लार्क या पदाची नोकरी लावतो म्हणून नेरळ गावातील निलेश दत्तात्रय भिसे यांचा मुलगा प्रथमेश याला नोकरीला लावण्यासाठी सहा लाख रुपयांना गंडा घातला होता. तर प्रथमेश निलेश भिसे यालानोकरी लावली जात नसल्याने आणि नोकरीचे आमिष दाखवणारे सूत्रधार सागर काटे यांनी आयोजित केलेल्या मुलाखतीही या देखील बोगस असल्याचे सिद्ध झाल्यावर आपले फिर्यादींचे सहा लाख रुपये बुडाले असल्याची खात्री झाली.
त्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये भिसे निलेश दत्तात्रेय यांनी स्वतःला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाली असल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाणे येथे नोंदवली. नेरळ पोलीस ठाण्यात आठ जणांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४),३१६(२),३३६(२),३३६(३),३४०(२),३(५) नुसार गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत राहुल उर्फ आशिष रामभाऊ वारे आणि नितीन महादू वाघ या दोघांना अटक केली आहे. तर अन्य आरोपी अध्याप फरार आहेत. त्यातील चिंतन उर्फ सहा हा मृत पावला आहे.