माणगांवमध्ये नक्की चालाय काय अमित कॉम्प्लेक्स पाटोपाठ बामणोली गावामध्ये चक्क सर्व्हिस वायरची चोरी....

माणगांवमध्ये नक्की चालाय काय अमित कॉम्प्लेक्स पाटोपाठ बामणोली गावामध्ये चक्क सर्व्हिस वायरची चोरी….

माणगांवमध्ये नक्की चालाय काय अमित कॉम्प्लेक्स पाटोपाठ बामणोली गावामध्ये चक्क सर्व्हिस वायरची चोरी....

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :- माणगांव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बामणोली येथे बामणोली मांगवली कलमजे दोन आदिवासीवाडी तसेच बौद्धवादी या गावाना पाणी पुरवठा करनाऱ्या सर्व्हिस वायरची अज्ञात व्यक्तीकडून चोरी या व्यक्तीने जवळपास 40 मीटर वायर किंमत जवळपास 15 ते 20 हजार रुपयाची वायर कटिंग करून पोबारा केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार दि. 4/12/24 रोजी रात्रीच्या सुमारास कोणत्यातरी एका अज्ञात व्यक्तीने बामणोली व मांगवली या गावांना पाणी पुरवणाऱ्या मोटार सर्व्हिस वायरची कटिंग करून पोबारा केला. यावरती शासन या अज्ञात व्यक्तीनवर कोणती कारवाई करतील यावर ग्रामस्थांच लक्ष लागला आहे.

ग्रुप ग्रामपंचायत बामणोली चे पाणीपुरवठा कर्मचारी दाजी करकरे नेहमी प्रमाणे बामणोली गावातील नदीजवळ मोटार चालू करण्यासाठी गेले असता पाण्याची मोटार चालू का होत नाही हे विहरी जवळ पाहायला गेले असता त्याच्या निर्दशनात सर्व्हिस वायर कटींग झालेली दिसली असता ग्रामपंचायत सरपंच सुवर्णा राजेंद्र सकपाल उपसरपंच मंगेश पवार व ग्रामसेवक आदेश तेटगुरे यांच्या जवळ त्वरित संपर्क साधला त्यावेळी सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांनी घटनास्थळी जाऊन तपासनी केली असता जवळपास 40 मीटर सर्व्हिस वायर कोणत्यातरी अज्ञात व्यक्तीने कापून पोबारा केल्याचे पाहायला मिळाले यावेळी सरपंच व ग्रामसेवक यांनी माणगांव पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here