महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयुष्मान, ई – श्रम व अपार आयडी मोफत वाटप
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
कर्जत : भारतरत्न तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैशाली सायबर कॅफे डिकसळ येथे डिकसळ परिसरातील सर्व लोकांसाठी मोफत आयुष्मान कार्ड, ई – श्रम कार्ड व शालेय विद्यार्थ्यांचे अपार आयडी कार्ड बनवून ते वाटप करण्यात आले.
अ.पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली व हिंद पोलिस फ्रेंड असोसिएशन या संघटनेच्या व वैशाली सायबर कॅफे च्या माध्यमातून हे शिबिर राबविण्यात आले. या वेळी पोलिस मित्र संघटनेचे युवा अध्यक्ष प्रफुल जाधव (वैशाली सायबर कॅफे चे मालक) यांनी शिबिरादर्म्यान लोकांना आयुष्मान कार्ड, ई – श्रम कार्ड यांचे फायदे लोकांना पटवून सांगितले.