“अनेकींशी लग्न”: योगेश हुमणे यास नेरळ पोलिसांनी शिताफीने केले जेर बंद.

327
“अनेकींशी लग्न”: योगेश हुमणे यास नेरळ पोलिसांनी शिताफीने केले जेर बंद.

अनेकींशी लग्न”: योगेश हुमणे यास नेरळ पोलिसांनी शिताफीने केले जेर बंद.

“अनेकींशी लग्न”: योगेश हुमणे यास नेरळ पोलिसांनी शिताफीने केले जेर बंद.

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

नेरळ :- योगेश यशवंत हुमणे मुळ राहणार जामगे, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी यांनी शादी डॉट या शोशल मिडिया वेब साईट वर स्वतःचे नाव नोंदणी करून ह्या ठगाने एकीला १५ ते २० लाखांना गंडा घातल्याचे समोर येत आहे. या बाबत नेरळ पोलीस ठाणे येथे XYZ हिने नेरळ पोलीस ठाणे गाठून ०२३६/२०२४ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.

योगेश हुमणे हा शादी डॉट या शोशल मिडिया मध्ये स्वतःची अधिकृत खाते चालू करून सुरवातीला २०२१ मध्ये XYZ हीला यांचना केली व यात तीनेही ती स्वीकारली. तिला त्याने स्वतःचे आई वडील मयत असून बहिण पळून गेल्याचे सांगितले व विश्वास संपादन केले. तसेच XYZ सोबत वांद्रे कोर्टात लग्न ही केले. माझ्या पाठीठ दुखत असून मी गावाला जात आहे असे सांगून योगेश गावाला जायचा बहाणा करून त्याने XYZ हिची एफ डी. lic पोलिसी मोडायला लावली असेच अनेक करणे देऊन तब्बल १५ ते २० लाखांना गंडा घातला असे फिर्यादींनी fir मध्ये सांगितले आहे. तिला याचा स्वशय आल्याने योगेशच्या बहिणीचा फेस बुक वरील तपास केला असता. बहिणीने योगेशचे या आधीच लग्न झाल असून मुल असल्याचे सांगितले. या बाबत XYZ हिने नेरळ पोलीस ठाणे येथे २३६/२०२४ प्रमणे भारतीय न्याय संहिता बी एन एस २०२३ अन्वये ११५(२), ३१६(२), ३१८(२), ३१८(४), ३५१(२), ३५२, ८२(१) ,८५ गुन्हा नोंद केला आहे. त्या अनुषगाने पोलिसांनी सूत्र हलवण्यास सुरु करून प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे तपास करीत असून पोलीस उपनिरीक्षक मंडलिक व पोलीस हवालदार राजाराम पिंगळे यांनी आरोपीला मोठ्या शितापीने पकडले व आरोपीस न्यायालयाने तिन दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. आरोपी योगेशने बऱ्याच महिलांना असा गंडा घातल्याचे समोर येत असून सध्या बोरीवली येथील एका महिले सोबत साखरपुडा केल्यचे समोर येत आहे. तसेच एका महिला पोलीस हिला ही आपल्या जाळ्यात ओडून तिच्याशी लग्न केल्याचे समोर आले आहे.. तर योगेश सोबत लग्न झालेल्या काही पत्नी यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठून आपापली तकरार दाखल केली आहे. अधिक तपासात योगेशने आपल्या मोह्जाळ्यात कोणकोणते अपराध केले आहेत ह्या कडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. तर आरोपीस काही दिवसातच जेर बंद केल्याने नेरळ पोलिसांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.