धनदांडग्यांनी जिल्हा प्रशासनाचे आदेश चिरडले डंम्पर खाली*

84
धनदांडग्यांनी जिल्हा प्रशासनाचे आदेश चिरडले डंम्पर खाली*

*धनदांडग्यांनी जिल्हा प्रशासनाचे आदेश चिरडले डंम्पर खाली*

धनदांडग्यांनी जिल्हा प्रशासनाचे आदेश चिरडले डंम्पर खाली*
दोन गुन्हे दाखल असूनही संवेदनशील क्षेत्रात बेकायदा भराव सुरुच; मिळकतखार ग्रामस्थांचा १० वर्षापासून पर्यावरण रक्षणासाठी लढा

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: अलिबाग तालुक्यांतील रेवस बंदराजवळील मिळकतखार येथील खाडीमध्ये बेकायदेशीर भरावाचे प्रकरणी वारंवार तक्रारी करुनही अधिकाऱ्यांच्या संगनमताने भराव सुरु असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला आहे. गेली 10 वर्षे सावंत या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहेत, आताही या ठिकाणी भराव सुरु असून ग्रामस्थ दाद मागण्यासाठी गेले असता प्रांताधिकारी मुकेश चव्हाण हे रजेवर गेले आहेत, तर अलिबाग तहसिलदार फिरतीवर गेल्याचे सांगण्यात आले. प्रांताधिकारी मुकेश चव्हाण यांनी तक्रारदार यांना दोन दिवसांपुर्वी या प्रकरणी तहसिलदार अलिबाग यांना काम बंद करण्याचे लेखी आदेश दिलेले आहेत, असे सांगितले. त्यावर सावंत यांनी गेली १० वर्ष थोडेथोडे करुन हा बेकायदेशीर भराव पुर्णत्वाकडे नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत, हे प्रांताच्या लक्षात आणून दिल्यावर प्रांतांनी केलेला बेकायदेशीर भराव तहसीलदारांना आदेश देऊन काढून टाकण्यात येईल व सबंधितांना दंड ठोठावला जाईल, असे सांगितले होते. असे असतानाही हा भराव आजही जोमाने सुरु आहे. तहसिलदार विक्रांत पाटील यांनी सारळ मंडळ अधिकारी नलिनी पाटील यांना जागेवर जाऊन पहाणी करण्याचे आदेश दिले होते, असे सांगितले. तर गेले ६ दिवस तहसिलदार हे हिच गोष्ट वारंवार सांगत आहेत; परंतु काम बंद होत नाही, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे.
सदरची जागा कांदळवनयुक्त सी.आर.झेड मध्ये नो-डेव्हलपमेंट क्षेत्रात येत असल्याचा अहवाल सहाय्यक संचालक नगररचना यांनी २०१४ मध्येच तहसिलदार यांना दिलेला आहे. त्यामुळे बेकायदेशीर भराव करणाऱ्यांवर गेल्या १० वर्षात २०१४ व २०२२ मध्ये दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पर्यावरण कायद्यानुसार एकच गुन्हा वारंवार घडत असेल तर त्या जागेची जबाबदारी असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसुर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे व तक्रार मी शासनाकडे करणार असल्याची भूमिका संजय सावंत यांनी जाहिर केली आहे.
—-
प्रकरण काय?
अलिबाग तालुक्यांतील रेवस बंदराजवळील मिळकतखार येथील खाडीमध्ये बेकायदेशीर भराव केल्या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात वासवानी रिसॉर्ट तर्फे कार्यकारी संचालक यांच्यावर सन 2014 मध्ये गुन्हा दाखल असताना याच जागेत पुन्हा माती भराव सुरू झाला असून याबाबत अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी कोकण आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. कॉंग्रेसचे माजी आमदार स्व. मधुकर ठाकूर व मिळकतखार येथील ग्रामस्थांनी सन 2014 मध्ये या अनधिकृत भरावाकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार महसूल विभागाचे तत्कालीन मंडळ अधिकारी श्रीकांत कवळे यांनी स्थळ पहाणी करून पर्यावरण अधिनियम 1986 चे कलम 15 व प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52 अन्वये वासवानी रिसॉर्ट तर्फे कार्यकारी संचालक, जनक हरकिसनादास वासवानी यांच्यावर शासनातर्फे मांडवा सागरी पोलिस ठाण्यात क्र.05/2014 अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुन्हा सन 2022 साली याच कारणासाठी त्यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झाला होता. संजय सावंत यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहिती नुसार नगर रचना आणि मुल्य निर्धारण विभाग रायगड अलिबाग यांनी त्यांच्या दि. 20 डिसेंबर 2014 च्या तहसिलदार अलिबाग यांना दिलेल्या अहवालामध्ये मिळकतखार येथील भराव हा अनधिकृतपणे केला असल्याचे निर्देशनास आले होते. या माती भरावामुळे सीआरझेडचे उल्लंखन झाल्याचे निदर्शनास आले आहे, असे नमूद केले आहे. असे असतानाही पुन्हा या जागेत अनधिकृत भराव करून सी.आर.झेड व पर्यावरण कायदयाचे उल्लंघन केल्या प्रकरणी प्रकल्प व्यवस्थापनासोबतच जबाबदार महसूल अधिका-यांवरही गुन्हा दाखल करण्यांत यावा अशी मागणी संजय सावंत यांनी कोकण आयुक्तांकडे केली होती.