एस टी अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे प्रयत्न : आ. भरतशेठ गोगावले

57
एस टी अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे प्रयत्न : आ. भरतशेठ गोगावले

एस टी अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे प्रयत्न : आ. भरतशेठ गोगावले

एस टी अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे प्रयत्न : आ. भरतशेठ गोगावले

बस अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणार !

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-कुर्ला बस अपघात व दोन दिवसापूर्वी झालेल्या बेस्ट अपघातांची दखल घेत एस टी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरतशेठ गोगावले यांनी एस टी महामंडळाचे मॅनेजिंग डायरेक्टर, जनरल मॅनेजर व सर्व सदस्य पदाधिकारी यांची तातडीची बैठक घेऊन एस टी अपघात कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमावली याबाबत चर्चा करून तशा संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ. गोगावले यांनी एस टी तून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य गरिब व मध्यम वर्गीय जनतेला चांगली सुरक्षित सेवा देण्यासाठी व एस टी अपघात कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले.काही दिवसापुर्वी झालेल्या एस टी अपघाताची सखोल चौकशी करून त्या अपघातास चालक जबाबदार आहे की बस मधील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला हे तपासून दोषींवर कारवाई करण्यात येईल. मात्र असे अपघात झाल्यानंतर रडत बसण्या ऐवजी अथवा त्यानंतर उपाययोजना करण्या ऐवजी अपघात घडूच नये यासाठी काय करता येईल याला आपण प्राधान्य देऊ असे गोगावले यांनी सांगितले.

एस टी तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी जितकी चालकाची आहे तितकीच या गाड्यांची देखभाल करणाऱ्या कर्मचारी व त्यांचेवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची आहे. एस टी बसेस चांगल्या प्रतीच्या असाव्यात, त्यांच्या मेंटेनन्स साठी लागणारे पार्ट व साहित्याचा वेळेवर पुरवठा करणे ही आमची जबाबदारी आहे. मात्र बस मार्गस्थ करण्यापुर्वी ती सुस्थितीत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी चालक आणि त्या बसचे मेंटेनन्स ची जबाबदारी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आहे. बस मार्गस्थ झाल्यानंतर चालकाने कोणत्याही प्रकारची नशा करू नये अथवा बस सुरु असताना मोबाईल वर बोलू नये. एका सेकंदाची नजर हटली तर गाडीत असलेल्या प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो याची जाणीव कायम चालक व वाहकांना असली पाहिजे. एस टी च्या कायम व कंत्राटी सेवेत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना वरील अटी व शर्ती बंधन कारक असणार आहेत असे गोगावले यांनी सांगितले.

एस टी बस मधून क्षमते पेक्षा जास्त प्रवासी वाहतुक होत असते त्यामुळे या गाड्या सुस्थितीत असाव्यात यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.
एस टी च्या सेवेत असणाऱ्या चालकांना जादा तास ड्युटी करावी लागत असते अशावेळी त्यांना आराम करण्यासाठी सुस्थितीत असलेले विश्रामगृह व ठराविक तासानंतर त्यांना रिलीव्हर देण्याचा महामंडळाचा प्रयत्न असेल. एस टी च्या सेवेत चांगल्या बसेस याव्यात यासाठी खासगी बसेस ठेका पद्धतीने घेतल्या आहेत मात्र या ठेकेदारांकडून वेळेवर बसेस उपलब्ध होत नसतील आणि जुन्या बसेस मधून जर प्रवासी वाहतुक करावी लागत असेल तर संबंधित ठेकेदाराने आपला ठेका सोडावा म्हणजे महामंडळाला नवीन ठेका देता येईल असे गोगावले यांनी स्पष्ट केले.
एस टी कर्मचाऱ्यांचा वाढीव पगार, मेंटेनन्सचा वाढीव खर्च भरून काढण्यासाठी भाडे वाढ करणे क्रमप्राप्त असून या भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाला पाठवला असून त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर भाडेवाढ केली जाईल असे स्पष्ट करून एस टी चे नुकसान टाळण्यासाठी ज्या ठिकाणी दंगली, जाळपोळ, आंदोलने सुरु असतील अशा मार्गावर एस टी वाहतुक करणे टाळावे असे आवाहन आ. गोगावले यांनी केले.