चैतन्य सोनवणे ची धनुर्विद्येत उंच भरारी!
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: चैतन्य सोनवणे ने धनुर्विद्येत यश संपादन केले आहे. तो
केंद्रीय विद्यालय ओ.एन.जी.सी. मध्ये या ११सायन्स मध्ये शिक्षण घेत असून मौजे मोहोळचा पाडा पनवेल येथील रहिवासी आहे.त्याची राष्ट्रीय स्तरावरील उत्तर प्रदेश, लखनऊ येथे होणाऱ्या धनुर्विद्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड झाल्याने त्याचे अभिनंदन होत आहे.
अएम दिनांक 14 व 15 डिसेंबर रोजी अलिबाग नेहुली येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य इंदोर आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याला सीनियर ओपन विभागात सिल्वर मेडल मिळाले या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून खेळाडू आले होते यामधून चैतन्य याने राष्ट्रीय अडचणी चॅम्पियनशिप साठी निवड झाली त्याचे वडील संजय सोनवणे आई कीर्ती सोनवणे प्रशिक्षक मोरे सर यांच्या अनेक वर्षाच्या अथक परिश्रमाचे चीज चैतन्य ने धनुर्विद्या खेळात प्राविण्य मिळविले असून आई- वडिलांचे मित्र-मैत्रिणींकडून आई वडील व प्रशिक्षकावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे यावेळी त्याच्यासोबत संवाद केला असता मला धनुर्विद्येत जगामध्ये भारताचे नाव उज्वल करावयाचे आहे.