संस्था वेगळ्या उंचीवर नेण्याचे कार्य कौतुकास्पद माजी आ. बाळाराम पाटील यांचे गौरवोद्गार

संस्था वेगळ्या उंचीवर नेण्याचे कार्य कौतुकास्पद
माजी आ. बाळाराम पाटील यांचे गौरवोद्गार

संस्था वेगळ्या उंचीवर नेण्याचे कार्य कौतुकास्पद माजी आ. बाळाराम पाटील यांचे गौरवोद्गार
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: रायगड जिल्हयातील नामवंत शिक्षण संस्थामध्ये पीएनपी शैक्षणिक संस्थेचे नाव आवर्जून घेतले जाते. अगदी कमी कालावधीत पीएनपी शैक्षणिक संस्थेचा विस्तार झाला आहे. ग्रामीण भागातील गोरगरीबांची मुले या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शाळेतील शिक्षक प्रचंड मेहनत घेत आहेत. नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील यांचा वारसा शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या बरोबरच चित्रलेखा पाटील यांनी जपला आहे. पीएनपी शिक्षण संस्था एक वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम यांनी केले आहे, असे गौरवोद्गार माजी आ. बाळाराम पाटील यांनी काढले.
पीएनपी एज्युकेशन सोसायटीमधील शाळेसह विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मंगळवारी (दि.17) महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी बाळाराम पाटील बोलत होते.
यावेळी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील, शेकाप पुरोगामी युवक संघटनाचे जिल्हाध्यक्ष देवा पाटील, कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य ओमकार पोटे, शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, मुख्य कार्यालयाचे पदाधिकारी आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी बाळाराम पाटील म्हणाले, पीएनपी शिक्षण संस्थेने अगदी कमी कालावधीत नाव लौकिक केला आहे. प्रतिकूल परिस्थितीत निर्माण झालेली संस्थेने आता उंच भरारी घेतली आहे. जिल्ह्यातील मोजक्याच शिक्षण संस्थांमध्ये पीएनपी शिक्षण संस्थेचे काम उल्लेखनीय आहे. बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम या संस्थेमार्फत केले जात आहे. गोरगरीबांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी संस्था प्रचंड मेहनत घेत आहे. पीएनपी संस्थेच्या शाळांमध्ये वाढ होत आहे. दादा, भाऊंच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम जयंत पाटील यांनी केले आहे.
जागतिक शिक्षण क्षेत्रात नवी मुंबईचे आगमन होत असताना आपण मागे राहू नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तिसरी मुंबईची निर्मिती वेगाने होत आहे. ही मुंबई अलिबाग पेणकडे गतीने वळत आहे. या विभागात विकासाची चक्रे फिरणार आहेत. हा जिल्हा वेगाने पुढे जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार जो बदल होत आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देणे काळाची गरज आहे. रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरत आहेत विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त बदलत्या काळानुसार नव्या शिक्षणाची साधने खुले होणे अपेक्षित आहे. त्यानुसार शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असून त्यामध्ये टीकून राहण्यासाठी काम केले पाहिजे असे बाळाराम पाटील म्हणाले.

शाळांमधील दर्जा अधिक उंचावणार
चित्रलेखा पाटील यांची ग्वाही
खेड्यापाड्यात राहणाऱ्या गोरगरीबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे ही नाना पाटील आणि प्रभाकर पाटील यांचे स्वप्न होते. ते स्वप्न शेकापचे नेते या संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्यक्षात उतरविले. काही वर्षापुर्वी पीएनपी नावाची शैक्षणिक संस्थेचे एक रोपटे लावले. या रोपट्याचे आता मोठ्या वृक्षात रुपांतर होत असल्याचा आनंद आहे. जयंत पाटील यांनी ठेवलेला विश्वास आज सार्थक करण्यामध्ये यश आल्याचे समाधान आहे. जिल्ह्यात संस्थेच्या वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालये आहेत. गोरगरीब मुलांना इंग्रजीचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरु केले. आज शेकडो मुले आपल्या संस्थेमध्ये चांगल्या पध्दतीचे शिक्षण घेत आहेत. वेगवेगळ्या शाळांमध्ये अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे. पुढच्या काळात पालक, शिक्षक, विद्यार्थी मिळून एक वेगळ्या पध्दतीने काम करण्याचे स्वप्न आहे. शाळांमधील शैक्षणिक दर्जा अधिक उंचावणार अशी ग्वाही पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी दिली.

शाळांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
पीएनपी एज्युकेशन सोसायटीमधील शाळांसह विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मंगळवारी शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आला . विविध शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांसह शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांचा तसेच वेगवेगळ्या विषयांमध्ये अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here