*परभणी घटनेच्या निषेधार्थ सिंदेवाही तालुका काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन*
*दोषींवर कारवाई करा – सूर्यवंशी कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी*
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही ग्रामीण प्रतिनिधी
8806689909
सिंदेवाही :- परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालय पुढे घडलेल्या देशाच्या संविधान अवमान कारक घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले असून मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट फिरत आहे. देशाच्या पवित्र संविधानाचा अवमान करणाऱ्या तसेच या निषेधार्थ आंदोलनात न्यायालयीन कोठडीत मृत पावलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करून सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय द्या अशी मागणी सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने घटनेचा निषेध नोंदवीत तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
देशातील सर्व नागरिकांना समान हक्काने जगण्याचा अधिकार देणाऱ्या पवित्र संविधानाच्या रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. अशातच काही समाजकंटकांनी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाचा अवमान केला. या घटनेला बराच कालावधी लोटला असून असे देशद्रोह कृत्य करणारे समाजकंटक अजूनही मोकाटच फिरत आहे. तर संविधानाच्या अवमानाबाबत परभणीत निघालेल्या निषेधार्थ आंदोलनात सहभागी असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या दोन्ही घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले असून प्रशासन व शासन या संदर्भात गंभीर नसल्याने या घटनेचा ठीक ठिकाणी निषेध नोंदविल्या जात आहे. याच घटनेच्या निषेधार्थ आज सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वरील दोन्ही घटनेमधील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. सोबतच संविधान अवमान घटनेच्या निषेधार्थ लढा देणाऱ्या व न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत पावलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना मोठी आर्थिक मदत देऊन त्यांच्या कुटुंबीयातील एका सदस्याला शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासंदर्भात मागणी देखील करण्यात आली. यावेळी सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमाकांत लोधे, सिंदेवाही काँग्रेस शहराध्यक्ष सुनील उट्टलवार, बाबुराव गेडाम , अशोक तुम्मे,कृउबा समीती उपसभापति दादाजी चौके,नगराध्यक्ष भास्कर नन्नावार,उपनगराध्यक्ष पूजा रामटेके, मयूर सूचक,नरेंद्र भैसारे, महिला शहराध्यक्ष प्रीती सागरे, सागर गेडाम, रवी सावकुरे, पुष्पा सिडाम, सुखदेव इंदुरकर, महेन्द्र इजमनकर, सुरेश बोरकर,विलास रामटेके, दिलीप रामटेके,अशोक सहारे, मोरेश्वर ज्ञानवाडकर व तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी फ्रंटल ऑर्गनायझेशन व सर्व सेलचे पदाधिकारी तथा कार्यकर्ता गण प्रामुख्याने उपस्थित होते.