डॉ. पद्मरेखा धनकर यांना सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 19 डिसेंबर
माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून देण्यात येणारा ‘सुनीताबाई गाडगीळ स्मृती साहित्य पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ कवयित्री डॉ. पद्मरेखा धनकर आणि नवोदित कवयित्री प्राजक्ता माळी यांना ज्येष्ठ कवी आणि गीतकार प्रवीण दवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, माजी आमदार अनंत गाडगीळ मंचावर उपस्थित होते. धनकर म्हणाल्या, केवळ टाळ्या ही चांगल्या कवितेची पावती असू शकत नाही. चांगली कविता मनात रेंगाळत राहते. यावेळी त्यांनी मिळालेला पुरस्कार त्यांचे वडील प्राचार्य मदन धनकर आणि चंद्रपूरकरांना अर्पण केला.
त्यांच्या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, सचिव प्रशांत पोटदुखे व संचालक मडळाने अभिनंदन करण्यात आले आहे