पिस्तूल काढून जीवे ठार मारण्याची धमकी व मारहाण
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333
नेरळ :- काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना असून नेरळ पोलीसठाणे हद्दित नारळाची वाडी साळोख या ठिकाणी बी एस एन एल कंपनीचे टॉवर बसवणारे ठेकेदार शोएब यांनी संजू जगदीश मोहिते मूळ राहणार रामपूर आलीधारू, पोस्ट बोर्डी, तालुका अकोट, जिल्हा अकोला या सब ठेकेदारास तीस हजार रुपये देत नाही म्हणून एका हातात पिस्तूल व दुसऱ्या हातात कटावणी घेऊन …. गोळी घालीन असे सांगून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली..
सध्या कर्जत तालुक्यामध्ये बीएसएनएल कंपनीचे टॉवर बसवण्याचे काम वेगाने चालू आहे. त्यामध्ये शोएब शाबीर बुबेरे राहणार साळोख हे ठेकेदार असून त्यांना बीएसएनएल कंपनीकडून एक लाख ऐंशी हजार रुपये एका टॉवर बसवण्याचे मिळतात तर संजीव मोहिते हेच काम कमी दरामध्ये कामगार घेऊन करत आहेत ह्याचा राग मनात धरून दिंनक १८ डिसेंबर योजी शोएब यांनी संजु मोहिते यांना तू काम बंद कर व मला तू हे काम करत आहेस तर तीस हजार रुपये दे असे धमकावून निघून गेला. दिनांक १९ रोजी रात्री ८ वाजता तेथील काम चालू असलेल्या ठिकाणी दोन साथीदारांसोबत तोडफोड केली व एका हातात बंदूक घेऊन व दुसऱ्या हातात कटावणी घेऊन जीवे मारण्याची धमकीही दिली व मारहाण केली असे फिर्यादी यांनी सांगितले…
बंदूक पाहून संजय मोहिते व त्याचे इतर साथीदार घाबरून गेले व त्यातील एकाने त्याचा व्हिडिओ काढला परंतु व्हिडिओ काढत असताना शोएबने मोबाईल हिसकावून घेतला व त्यामध्ये सर्व व्हिडिओ डिलीट केले व संजीव च्या एका साथीदाराने तो व्हिडिओ त्याच्या भावाला व्हाट्सअप ला पाठव होता. तो व्हिडिओ डिलीट करायचा राहून गेला व हाच पुरावा म्हणून त्याने नेरळ पोलीस ठाण्यामध्ये दाखवला त्या अनुषंगाने २४५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०८(५), १२७ (२), ११५ (२), ३५२, ३५१(३), ३(५) भारतीय हत्यार कायदा १५९ चे कलम ३,२५ गुन्हा नोंद केली आहे..
सदरील घटनेचे गांभीर्य व मोबाईल मधील व्हिडिओ पाहून कर्तव्यदक्ष व रायगड जिल्ह्यात बेस्ट डिटेक्शन करणारे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी फिर्यादी व आरोपी या दोघांची मेडिकल चाचणी करण्यासाठी पाठवले व रात्री उशिरा नेरळ पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली ..
ही बंदूक शोएब ने कोठून आणली? त्याच्याकडे बंदुकीचा परवाना आहे की नाही? अशी बंदूक आणून व धमकावण्याचा प्रकार होत असल्यामुळे सर्वसामान्य माणसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..
बंदूक खरी आहे की खोटी आहे याचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप फड करीत आहेत.