श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय ,वडनेर द्वारा उप विभागीय कार्यालयाला सामाजिक प्रकल्प भेट.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट:- श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय, वडनेर द्वारा प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उप विभागीय कार्यालयाला भेट देण्यात आली यावेळी उप विभागीय अधिकारी चंद्रभान खंडाइत यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उत्तमराव पारेकर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेले सामाजिक प्रकल्प प्रती भेट देण्यात आल्या .

यात फास्ट फूड विषयक विद्यार्थ्यांचे वाढते आकर्षण आणि त्याचे शरीरावर दुष्परिणाम ,वातावरणातील बदलाचा शेतकर्याच्या उत्पन्नावर होणारा आर्थिक परिणाम ,वडनेर परिसरातील बोलीभाषेचे अध्ययन ,ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा विषयक अध्ययन क्षमतेचा राज्यशास्त्र विषयाच्या माध्यमातून अभ्यास ,नाथ जोगी भटक्या समाजातील शैक्षणिक व आर्थिक वास्तव ,जिल्हा परिषद शाळा मधील शारीरिक शिक्षण आणि खेळ विषयक सुविधा यांचा अभ्यास ,वडनेर परिसरातील इंग्रजी भाषा विषयक अध्ययन ,छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले एक ऐतिहासिक अध्ययन याविषयावरील सामाजिक प्रकल्प भेट देण्यात आले.

श्री खंडाइत साहेबांनी प्रत्येक सामाजिक प्रकल्प बारकाईने पहिला त्यातील फोटो ,आलेख आकृती ,यावर प्राध्यापकांशी चर्चा केली या सामाजिक प्रकल्पाची माहिती वर्धेच्या जिल्हा अधिकार्यांना देण्याचे आश्वासन त्यांनी प्राचार्य आणि प्राध्यापकांना दिले  यावेळी डॉ .प्रवीण कारंजकर ,डॉ.नरेश भोयर ,डॉ.विनोद मुडे ,डॉ.गणेश बहदे ,प्रा.नितेश तेलहांडे ,प्रा .पंकज मुन ,प्रा.संजय दिवेकर आदी प्राध्यापक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here