गोविंदपुर परिसरात आरोग्य सेवा ,शिक्षण , व बस सेवा सुविधा ताबडतोब निर्माण करा. आनंद भाऊ शेंडे सामाजिक कार्यकर्ते

141
गोविंदपुर परिसरात आरोग्य सेवा ,शिक्षण , व बस सेवा सुविधा ताबडतोब निर्माण करा. आनंद भाऊ शेंडे सामाजिक कार्यकर्ते

गोविंदपुर परिसरात आरोग्य सेवा ,शिक्षण , व बस सेवा सुविधा ताबडतोब निर्माण करा.
आनंद भाऊ शेंडे
सामाजिक कार्यकर्ते

गोविंदपुर परिसरात आरोग्य सेवा ,शिक्षण , व बस सेवा सुविधा ताबडतोब निर्माण करा. आनंद भाऊ शेंडे सामाजिक कार्यकर्ते

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
मो न 8806689909

सिंदेवाही :- मौजा गोविंदपुर व परिसर हा जंगल व्याप्त परिसर आहे. आजूबाजूचे 15- 16 गावची जनता रोज या गावाशी संपर्कात असतात . साधारण बाजारपेठ आहे, मात्र या गावला पाहिजे त्याप्रमाणात अजूनही सुविधा नाही आहेत.
गावला आरोग्य उपकेंद्र असून तज्ञ डॉ. नाही व औषधी साठा सुद्धा पुरेसा राहत नाही.
एवढा मोठा मध्यवर्ती गाव 60 -70 विद्यार्थी तलोधीला शाळा कॉलेजला सायकलने जंगली जनावराशी सामना करून प्रवास करीत असूनही बरोबर बस सुविधा नाही.
अनेकदा शासन प्रशासनास आणि लोकप्रतिनिधीकडे स्वतः हजर राहून व चर्चा करून गोविंदपूर वरून बस सुविधा सुरू करा असे निवेदाद्वारे माहिती दिली मात्र सर्व स्तरांत दुर्लक्षित करण्यात आले आहे. तेव्हा आतातरी विशेष लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे.
ग्रामीण रुग्णालय व तज्ञ डॉक्टर, कर्मचारी ची वाढ करावी.जी प शाळे मध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारणे साठी शिक्षणतज्ञ ची नेमणूक करून ग्रामीण भागात उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी तयार व्हावे असे उपाययोजना करावे. ब्रम्हपुरी नागभीड गोविंदपूर नेरी चिमूर बस नियमित जाणे येणे सुरू करा.गडचिरोली आरमोरी तलोधी गोविंदपूर नेरी चिमूर बस नियमित जाणे येणे सुरू करा. चिमूर नेरी गोविंदपूर तलोधी बस नियमित जाणे येणे सुरू करा नागपूर उमरेड भीसी जांभुळघाट लोहरा बोथली गोविंदपूर तलोधी आरमोरी गडचिरोली बस नियमित जाणे येणे सुरू करा.
गोविंदपुर येथील तांबे खदान चे पुरातन सरवेनुसार उथखणान करण्याचे नियोजन करून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी. गोसीखुर्द चे पाणी घोडझरी तलावात पाडण्यासाठी शेतकरी हिताचे दृष्टीने प्राधान्याने नियोजन करावे. घोडझरी मुख्य नहराचे 0 माईन पासून 60 चे पुलापर्यंत मजबुती करण व पूर्ण नहरचे कांक्रीटिकरण करणे फारच आवश्यक आहे. अगदी शेती हंगामाचे वेळीच नहर नेहमी फूटतो आहे.घोडझरी नहराचे आतमधून गाळ उपसा ,वाढलेली झाडे झुडपे सापसपाई करणे व नहराचे मजबुती करण ,रुंधी करण करणे आवश्यक आहे.घोडाझरी नहराच्या लहान वितरिका सापसफाई,रुंदीकरण , करणे आवश्यक आहे, शेतकऱ्यांना हंगामाचेवेली फारच अवघड होते.
शासन प्रशासनाने व लोकप्रतिनिधी यांनी आपल्या माध्यमातून आवश्यक पाठपुरावा करून ग्रामीण भागात असलेल्या अनेक विषयी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करून सामान्य कष्टकरी शेतकरी कामगार ग्रामीण विकासाला चालना देणारा नियोजन करावे अशी परिसरातील जनतेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.