आंबेवाडी ग्रामसभेत प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध तसेच रस्त्याचे कामाविषयी ठराव,अन्यथा ग्रामस्थ उपोषणाला बसणार

80
आंबेवाडी ग्रामसभेत प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध तसेच रस्त्याचे कामाविषयी ठराव,अन्यथा ग्रामस्थ उपोषणाला बसणार

आंबेवाडी ग्रामसभेत प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध तसेच रस्त्याचे कामाविषयी ठराव,अन्यथा ग्रामस्थ उपोषणाला बसणार

आंबेवाडी ग्रामसभेत प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध तसेच रस्त्याचे कामाविषयी ठराव,अन्यथा ग्रामस्थ उपोषणाला बसणार

✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞

कोलाड :- आंबेवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा सोमवार दि१६ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आली. या ग्रामसभेत आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध व्हावा तसेच मुंबई गोवा हायवेचे काम ग्रामस्थांच्या मागणी नुसार करण्यात यावा असा ठराव आंबेवाडी ग्रामसभेत घेण्यात आला.
यावेळी प्रशासक अधिकारी एस.एन.गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी डी.यु पाबरेकर,माजी सरपंच सुरेश महाबळे,प्रितम पाटील,चंद्रकांत लोखंडे,कुमार लोखंडे ,संजय कुर्ले,महेंद्र वाचकवडे,श्रीकांत चव्हाण,अविनाश पलंगे,विनायक लोखंडे,भरत सातांबेकर,दादा धुमाळ,शिक्षक गर्जे,वनविभागाचे अधिकारी,डॉक्टर वाघ,अंगणवाडी सेविका,उपस्थित होते
वरील विषयानुसार मुंबई-गोवा हायवेला लागून असणाऱ्या आरोग्य केंद्र आहे.या ठिकाणी अनेक अपघाताचे पेशेंट व परिसरातील नागरिक वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येत असतात.येथे तीन डॉक्टरची आवश्यक्यता असतांना येथील आरोग्य केंद्रात एकच डॉक्टर असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच दवाखान्यातील कर्मचारी ही उपलब्ध नसतात तसेच वातावरणात बदल झाल्याने नागरिकांना होणाऱ्या त्रासावर सर्दी खोकल्याचे औषधे उपलब्ध ही नाही याविषयी ग्रामसभेत ठराव घेण्यात आला.
तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या चौपदरी करण्याचे काम सुरु असुन आंबेवाडी बाजारपेठेतील उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. हा उड्डाण पूर्णपणे पिलरवर असावा.सन १९८९ व २००५ मध्ये पुरामध्ये निर्माण झालेली पूर स्थिती निर्माण होऊ नये यासाठी आंबेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावर पूर्णपणे उड्डाण पूल असावा जेणेकरून पुरस्थितीचा
धोका होऊ नये यासाठी ग्रामस्थांची जनसुनावणी लावून नागरिकांची मते व प्रश्न विचारात पुढील काम करावे अशी मागणीचा ठराव ग्रामपंचायतीमध्ये घेण्यात आला.
तसेच याविषयी ग्रामस्थांच्या वतीने भरत सातांबेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी,खासदार सुनिल तटकरे,खासदार धैर्यशील पाटील, कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे,आमदार रवी पाटील जिल्हा अधिकारी रायगड यांना निवेदन देण्यात आले असुन जर ग्रामस्थांना विचारात न घेता काम सुरु राहिले तर १० जानेवारी २०२५ रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भरत सातांबेकर यांनी दिला आहे.