मांडवा येथे नेत्रतपासणी शिबिर संपन्न .
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९९३
अलिबाग : दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ ,माजी समाजकल्याण सभापती,रा.जि.प.यांच्या संकल्पनेनुसार आणि संयोजनाने, ‘दी लाईफ फाउंडेशन’ आणि नवीन पनवेलच्या ‘शंकरा आय हॉस्पिटल’च्या संयुक्त विद्यमाने धोकवडे ग्रामपंचायतींतर्गत मांडवा येथे मोफत नेत्रतपासणी आणि मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले , ह्याच शिबिरास्थळी विनामूल्य ‘आयुष्मान भारत’ ओळखपत्र नोंदणी शिबीर देखील आयोजित करण्यात आले,यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ह्यावेळी,द लाईफ फाऊंदेशनचे रायगड जिल्हा समन्वयक शिलानंद इंगळे, समाजसेविका सौ.राखी राणे, प्रणव ओव्हाळ, पनवेलच्या शंकरा आय हॉस्पिटलमधील टीम मॅनेजर विजय बामणे, डॉ. सोनाली सुभेकर, कर्मचारी कु.रुचिका जंगम, कु.सोनाली पंदेरे, कु.सागर पाटील तसेच मांडवा येथील कार्यकर्ते राजेश धुळे,.गजानन पाटील, राजेंद्र कोळी, लवलेश पाटील, ओमप्रकाश किल्लेकर, गणेश कोळी, त्रिगुण पाटील दीपक कोळी, नीलेश पाटील, प्रीतम कोळी, विदेश कोळी, मनोज म्हात्रे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.याच बरोबर छोटमशेठ यांच्या कार्यालातील टीम उपस्थित होती.