सायकलवरून पडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू

39
सायकलवरून पडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू

सायकलवरून पडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू

सायकलवरून पडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: अलिबाग तालुक्यातील चोंढी बामणसुरे येथे सोमवारी (दि. 23) रोजी संध्याकाळच्या वेळी दुःखद घटना घडली आहे. प्रशांत विचारे यांचा नऊ वर्षीय मुलगा मिहीर विचारे हा सायकलवरून पडून जखमी झाला होता, त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याचे निधन झाले. त्याच्यावर मंगळवारी रात्री उशिरा बामणसुरे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बामणसुरे येथील प्रशांत विचारे यांचा एकुलता एक मुलगा कु. मिहीर प्रशांत विचारे (9) हा बामणसुरे गावातच सायकल चालवत असताना अचानक तोल जाऊन पडला, काही वेळाने तो आपल्या घरी गेल्यावर अत्यवस्थ झाला, तेव्हा घरातील सदस्यांनी त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तेव्हा डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुलाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. सदर मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्यानंतर काही वेळाने उपचारादरम्यान प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी शेवटी मृत घोषित केले. मुलाच्या अकस्मात मृत्यूबाबत पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.