There was an argument between the MP and the MLA. Video of Shiv Sena MP directly threatening BJP MLA goes viral on social media.
There was an argument between the MP and the MLA. Video of Shiv Sena MP directly threatening BJP MLA goes viral on social media.

खासदार व आमदार यांच्यामध्ये वाद झाला. शिवसेना खासदाराची भाजपा आमदाराला थेट धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची सभा होण्यापूर्वी शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार राजेंद्र पाटणी या दोघांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. यानंतर वाशिममध्ये काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. राजेंद्र पाटणी यांनी भावना गवळींविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे वाशिममध्ये तणाव निर्माण झाला होता. 

वाशिम:- शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दीक बाचाबाची झालीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये खासदार गवळी यांनी भाजपा आमदाराला थेट धमकी दिलीय. त्यामुळे, वाशिम जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्येही या व्हिडिओचीच दिवसभर चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार-खासदाराची ही बाचाबाची पाहून उपस्थित कार्यकर्तेही अवाक झाले होते, शेवटी सर्वपक्षीयांनी पुढाकार घेऊन बैठकीतीला हा तंटा मिटवला. पण, याची चर्चा अद्यापही सगळीकडे सुरुच आहे.

प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये वाद झाला अन क्षणातच शहर बंद होण्यास सुरुवात झाली. भाजपाच्यावतिने पाटणी चौकामध्ये आंदोलनही केले. त्यामुळे शहरातील दुकानदारांनी सुध्दा घाबरून आपली प्रतिष्ठाने बंद केली. यामध्ये या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. वातावरण चिघळू नये याकरिता जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून मतभेद होते, परंतु त्यावर दोन्ही नेते दुर्लक्ष करीत आपआपला कारभार चालवत होते. परंतु या मतभेदाचा बांध प्रजासत्ताक दिनी फुटला असून नागरिकांत चर्चेला उधाण आले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

खासदार भावना गवळी यांनी भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांना थेट धकमी दिल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे. जास्तीचे नाटकं नाही करायचे, तुला घरात घुसून मारेन… अशी सीबीआय चौकशी लावेल माय-बाप दिसेल, असे खासदार गवळी यांनी म्हटल्याचे या व्हिडिओत ऐकू येत आहे. यावेळी, दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली असून एकमेकांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात राजकीय चर्चेला उधाण आले. जिल्हयात इन मिन तीन आमदार व एक खासदार आहे. विकासासाठी एकत्रितपणे झटून जिल्हयाचा विकास करण्याऐवजी लोकप्रतिनिधीच आपसात भांडत बसणार तर सर्व सामान्य जनतेनी न्याय तरी कुणाला मागावा असा प्रश्न नागरिकांतून केल्या जात आहे.

आमदार पाटणी यांनी यांची तक्रार
आ. पाटणी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, ते त्यांचे स्वीय सहायक, अंगरक्षकासह नियोजन कार्यालयात प्रवेश करत असता आतील पॅसेजमध्ये खा. भावना गवळी, आ. गोपीकिशन बाजोरिया आणि ५०-६० लोक उभे होते. यावेळी खा. गवळी यांनी आवाज दिला आणि मला दमदाटी करत तुमच्या तक्रारी करीन, तुम्हाला पाहून घेईन अशी तक्रार दाखल केली.

खासदार गवळी यांची तक्रार
खा. भावना गवळी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, जिल्हा नियोजन भवनमध्ये अंगरक्षक, स्वीय सहायकासह जात असताना मला आ. गोपीकिशन बाजोरिया भेटले. त्याठिकाणी शेतकरी वर्ग व शहरातील काही मंडळी गुंठेवारी तसेच इतर समस्यांकरिता मला व पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी जमलेले होते. मी त्यांच्याशी बोलत असताना आ. पाटणी यांच्यासह ७०-८० लोक सभागृहाबाहेर आले. आ. पाटणी यांनी मला व आ. बाजोरिया यांना सांगितले, गुंठेवारीच्या विषयामध्ये तुम्ही पडू नका. तुम्ही किती प्रयत्न केले तरी मी गुंठेवारीची खरेदी नियमित होऊ देणार नाही. त्यानंतर त्यांनी अर्वाच्च भाषेत बोलणे सुरू केले. शहरातील विकासकामे होऊ न देण्याची धमकी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here