जिल्हा पुरवठा विभाग अंतर्गत जागो ग्राहक जागो या पथनाट्यातून जनजागृती…..

63
जिल्हा पुरवठा विभाग अंतर्गत जागो ग्राहक जागो या पथनाट्यातून जनजागृती.....

जिल्हा पुरवठा विभाग अंतर्गत जागो ग्राहक जागो या पथनाट्यातून जनजागृती…..

जिल्हा पुरवठा विभाग अंतर्गत जागो ग्राहक जागो या पथनाट्यातून जनजागृती.....
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालय,रायगड- अलिबाग, जिल्हा पुरवठा विभाग, रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग समुद्रकिनारा, अलिबाग बस स्थानक या ठिकाणी पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. ग्राहकांना प्राप्त असणा-या हक्कांचे जसे की, सुरक्षिततेचा हक्क, माहिती मिळविण्याचा हक्क, निवडीचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क, बाजू ऐकून घेतली जाण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क इ.चे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ग्राहकांनी शासनाला सहाय्य करण्याबाबत, जबाबदा-या व कर्तव्ये- पावतीशिवाय माल खरेदी करताना किंमत व गुणवत्ता तपासून घेणे, तक्रार निवारणासाठी योग्य ठिकाणी दाद मागण्यास शिकावे, स्वतःची फसवणूक होऊ नये म्हणून शक्यतो काळजी घेणे इ. बाबत ग्राहकांमध्ये जागरुकता येणे आवश्यक असल्याने त्याप्रकारचे संदेश व माहिती प्रसिध्दी माध्यमांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे प्रयोजन असल्याने त्यानिमित्ताने जिल्हा पुरवठा कार्यालय रायगड अलिबाग, सहा. आयुक्त, अन्न औषध प्रशासन, पेण, सहा. नियंत्रक, वैध मापन विभाग, अलिबग येथे पथनाटय तसेच ग्राहक जनजागृतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी भारत वाघमारे, प्रभारी सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी संगीता दराडे, प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी व कर्मचारी तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी तसेच सहा.आयुक्त, अन्न औषध प्रशासन, पेण व सहा. नियंत्रक, वैध मापन विभाग या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, प्रिझम संस्थेचे कलाकार विनोद नाईक, प्रतिक कोळी, प्रणाली तळेगावकर, निकी बेंडे, तुषार राऊळ, हर्षाली नागावकर, वेदिका लाडगे, दर्श नागोटकर व बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित होता.