१० जानेवारी रोजी करणार अमरण उपोषण, आंबेवाडी नाक्यावरील उडान पुलाविषयी ठरल्याप्रमाणे उपोषण सामाजिक कार्यकर्ते भरत सतांबेकर यांचा इशारा,ग्रामस्थांचा पाठींबा
✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞
कोलाड :- मुंबई-गोवा हायवे वरील आंबेवाडी नाक्यावर सद्या उड्डाण पुलाचे काम सुरु असुन ते काम करतांना ग्रामस्थांना विश्वासात न घेता चालले असुन संबंधित ठेकेदार याला ग्रामस्थांचे काही ही घेणे देणे लागले नाही.असे दिसून येत आहे.यामुळे आंबेवाडी नाक्यावरील उड्डाण पुलाविषयी ठरल्या प्रमाणे येत्या १० जानेवारी २०२५ रोजी उपोषणाला बसणार असणार असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते भरत सतांबेकर यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.यांना ग्रामस्थ पाठींबा देण्याचे संकेत मिळतआहे.
यावेळी भरत सतांबेकर,लाला शिंदे,जगदीश प्रभू, कुमार लोखंडे,प्रदीप एकबोटे, बाबू हळदे,प्रचित तेलंगे, दिपक सातांबेकर,असंख्य रिक्षा व मिनिडोअर चालक उपस्थित होते.
प्रतिक्रिया
आंबेवाडी बाजारपेठेतच्या उड्डाण पुलाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी,खासदार सुनिल तटकरे,खासदार धैर्यशील पाटील, कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे,आमदार रवी पाटील,कॅबिनेट मंत्री भरत गोगावले,माजी आमदार अनिकेत तटकरे जिल्हा अधिकारी रायगड यांना देण्यात आलेल्या निवेदणात असे नमूद करण्यात आले आहे कि १९८९ तसेच २००५ रोजी जो महापूर झाला त्यावेळी जुन्या रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी तर पुर्वे कडील घरात आठ ते नऊ फूट पाणी होता तेव्हा पाणी जाण्यासाठी जागा होती परंतु आता उड्डाण पूल झाला तर पाणी जाण्यासाठी जागा उरणार नाही यामुळे भयानक परिस्थिती निर्माण होईल. यामुळे ग्रामस्थांना विश्वासात घेऊन या पुलाचे पिलर हे अंबर सावंत मंदिरा पर्यंत बांधावेत यामुळे पूर्वेकडील ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामपंचायत कार्यालय,अंगणवाडी येथे जाण्यासाठी वळसा घालावे लागणार नाही.परंतु मी दिलेल्या निवेदनाची शासनाने दख्खल येत्या १० जानेवारी पर्यंत न घेतल्यास अमराणउपोषला बसणार आहे.
भरत सातांबेकर
सामाजिक कार्यकर्ते
प्रतिक्रिया
मुंबई-गोवा हायवेचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे.ते कसे करतात हे ग्रामस्थांना माहिती नाही. तसेच ग्रामस्थांच्या असंख्य असणाऱ्या मागण्या पूर्ण करा अन्यथा भरत सातांबेकर यांना पाठींबा देऊन जन आक्रोश आंदोलन करू
लाला शिंदे
सामाजिक कार्यकर्ते
प्रतिक्रिया
गेली दहा वर्षांपासून आंबेवाडी बाजारपेठेतील व्यापारी वर्ग,समस्त ग्रामस्थ तसेच समस्त माता भगिनी यांनी हा पूल पनवेलच्या धर्तीवर व्हावा यासाठी लोकप्रतिनिधीना निवेदन देण्यात आले.परंतु आमच्या माहिती नुसार हा उड्डाण पूल दोन ते तीन पिलरवर होत आहे असे न होता तो पनवेल सारखा व्हावा नाहीतर आम्ही आंदोलन करू
जगदीश प्रभू
व्यापारी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६वरील आंबेवाडी बाजारपेठेतील उड्डाण पुलाचे काम सुरु असुन ते फक्त दोन ते तीन पिलरवर होणार असल्याचे संकेत मिळत असुन ते पूल ग्रामस्थांना विश्वासात घेऊन करावे याविषयी लोकप्रतिनिधीना निवेदन देण्यात आले असुन याविषयी येत्या १० तारखेपर्यंत कोणताही निर्माण मिळाला नाही तर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते भरत सातांबेकर, व्यापारी वर्ग व ग्रामस्थ यांच्या कडून देण्यात आला आहे.