रायगड जिल्ह्यात दोन हजार पंचवीसला होणार राजकीय भूकंप

115
रायगड जिल्ह्यात दोन हजार पंचवीसला होणार राजकीय भूकंप

रायगड जिल्ह्यात दोन हजार पंचवीसला होणार राजकीय भूकंप

रायगड जिल्ह्यात दोन हजार पंचवीसला होणार राजकीय भूकंप

विरोधी पक्ष अस्तित्वातच राहणार नाही – संजय (आप्पा) ढवळे

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-देशात तसेच महाराष्ट्रत भाजप पक्षाचे मोठे वर्चस्व वाढत चालले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेक लोक उपयोगी विकासात्मक ध्येय धोरण सरकार मार्फत राबवत असल्याने भाजप पक्षात मोठी वाढ होताना दिसत आहे.अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यात देखील भाजपचे कमळ हे जोरदार पणे फुलत चालले असून २०२५ नवीन वर्षा मध्ये रायगड जिल्ह्यात यावेळी एक राजकीय भूकंप होणार असून राजकीय विरोधी पक्ष हा अस्तित्वातच राहणार नसल्याचे खात्रीशीर पणे एक मोठे वक्तव्ये भारतीय जनता पार्टीचे माणगांव तालुका माजी अध्यक्ष तसेच भाजप पक्षाचे रायगड द. जिल्हा कंमिटीं सदस्य संजय(आप्पा) ढवळे यांनी गुरवार दि.२६ डिसेंबर रोजी आपल्या कार्यालयातून प्रसार माध्यमाजवळ बोलताना सांगितले.

संजय (आप्पा)ढवळे यांनी पुढे बोलताना सांगितले की रायगड दक्षिण जिल्हा असो या उत्तर या दोन्ही भागात भाजप पक्ष गेल्या चार ते पाच वर्षा पासून जोरदार पणे वाढत चालला असून या जिल्ह्यात भाजप पक्षाच्या माध्यमातून अनेक मोठ मोठी विकास कामे ही मार्गी लागली आहेत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभाव शाली कामामुळे रायगड जिल्हात २०२५ या नवीन वर्षात मोठ्या प्रमाणात बदल घडणार असून राजकीय कोणताच विरोधी पक्ष हा अस्तित्वात राहाणार नसून फक्त भाजपाचे कमळच आणि कमळच रायगड जिल्ह्यात दिसणार असल्याचे त्यांनी खात्रीशीर व गांभीर्य पूर्वक मोठे वक्तव्ये केले असल्याने आता दोन हजार २०२५ या वर्षात भाजप पक्षात कोण कोण राजकीय पक्ष प्रवेश करणार या कडे रायगडच्या जनतेचे लक्ष असणार आहे.