नात्याला काळीमा! शरीर संबंधास विरोध करणाऱ्या वहिनीचा गळा दाबून खून.

60

नात्याला काळीमा! शरीर संबंधास विरोध करणाऱ्या वहिनीचा गळा दाबून खून.

Disgrace the relationship! Murder by strangulation of a daughter-in-law who opposes sexual intercourse
Disgrace the relationship! Murder by strangulation of a daughter-in-law who opposes sexual intercourse

लखनऊ:- शरीर संबंधास विरोध करणाऱ्या वहिनीचा दीराने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील कलंजरी गावात ही नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून याप्रकरणी पोलीसांनी आरोपी मानिक शर्मा यास अकट केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरी कोणी नसल्याचा फायदा घेत दीर मानिक शर्मा याने त्याच्या वहिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्याच्या या दुष्कर्मास विरोध केल्याने आरोपीने तिचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी शर्माने खूनाची कबुली दिली.

मेरठ पोलिसांनी सांगितले की, कलंजरी गावचे राजू शर्मा हरियाणात एका हाॅटेलमध्ये काम करतात. घटनेच्या वेळी त्यांची पत्नी कुमुद घरी एकटी होती. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत आरोपीने वहिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. विरोध करताच आरोपी मानिकने तिचा गळा दाबून खून केला.

राजू यांचा लहान भाऊ शेतातून जेव्हा घरी आला तेव्हा त्याला कुमुद मृतावस्थेत असल्याची दिसून आली. पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालायत पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी मानिक शर्माला अटक केली असून मेरठ पोलीस पुढील तपास करत आहेत.