रिपब्लिकन नेते उपेंद्र शेंडे यांचे निधन, मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात होते अग्रगण्य

37

मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याला निर्णायक स्वरूप देणारे रिपब्लिकन नेते मा आ उपेंद्र शेंडे यांचे निधन 

नागपूर: मराठवाडा विद्यापीठाला प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी १६ वर्षे आंबेडकरी जनतेला संघर्ष करावा लागला रिपब्लिकन पक्षाचे (खोब्रागडे) १९९० साली आमदार म्हणून निवडून आलेल्या उपेंद्र शेंडे यांनी विधान सभेत सातत्याने तीन वर्षे हा प्रश्न मांडला आणि सरकार गंभीर नाही असे लक्षात आल्यावर नामांतर नाही तर सत्तांतर अशी घोषणा देऊन त्यांनी १५ औगस्ट १९९३ रोजी पासून आमरण उपोषणाला बसले होते त्यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर प्रा जोगेंद्र कवाडे यांना सोबत घेऊन लाखोंच्या मोर्चा काढला तरीही सरकार दुर्लक्ष करत आहे असे लक्षात आल्यावर तत्कालीन पंतप्रधान पी व्हि नरसिंह राव यांना नागपूर येथे केंद्रीय मंत्री एन के पी साळवे यांच्या घरी सुरक्षा यंत्रणा चुकऊन भेटून त्यांना सर्व परिस्थिती सांगितली व मुख्यमंत्री शरद पवार हे नामांतर प्रश्नी दुर्लक्ष करत आहेत अशी तक्रार केली त्यावेळी पंतप्रधान पी व्हि नरसिंह राव यांनी मुख्यमंत्री शरद पवारांना नामांतर प्रश्नी तात्काळ निकाली काढा असे सांगितले त्यानंतर अवघ्या काही दिवसांत म्हणजेच १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाला प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देऊन नामविस्तार करण्यात आला अशा प्रकारे नामांतर लढ्याला निर्णायक यश मिळवून देणारे रिपब्लिकन पक्ष ( खोरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेंद्रजी शेंडे यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी आज पहाटे ३-३० वा दु:खद निधन झाले आहे 

त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ५-०० वा सुमारास अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ गोपीचंद मेश्राम यांनी दिली आहे 

सन १९९० साली रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य फुटल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे (खोब्रागडे) उमेदवार म्हणून उपेंद्र शेंडे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते त्यापुर्वी सुद्धा त्या मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाचे (खोब्रागडे) आमदार निवडून आले होते मा आ उपेंद्र शेंडे यांना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मंत्रीपदाची औफर दिली होती मात्र त्यांनी मी काँग्रेस विरोधात निवडून आलो आहे व मराठवाडा विद्यापीठाला प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी आपल्या सरकारने टाळाटाळ केली आहे त्यामुळे मी आपल्या पक्षाला पाठिंबा देऊ शकत नाही असे सांगितले असे बोलणारा निष्ठावान, प्रामाणिक, निस्वार्थी, त्यागी नेता त्यांच्या निधनाने आंबेडकरी जनतेने गमावला आहे अशी प्रतिक्रिया पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी दिली आहे 

खैरलांजी अत्याचार जगासमोर आणण्याचे काम त्यांनी केले अनेक अन्याय अत्याचार प्रसंगी ते धाऊन जात समाजाची बाजू मांडत होते परभणी येथे प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा आणि संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणानंतर त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे भेट देता आली नव्हती त्यामुळे अमरावती येथे रविवारी २२ डिसेंबर रोजी पक्षाची केंद्रीय कार्यकारिणी बैठक संपल्यानंतर नागपूरला येऊन पुन्हा परभणी येथे जात असताना पुसद येथे त्यांना पैरिलिसिस आणि ब्रेन हैमरेजचा अटैक आला पुसद येथे वैद्यकीय उपचार केले मात्र पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले होते सोमवारी त्यांच्या मेंदूतील रक्ताच्या गाठी औपरेशन करून काढण्यात आल्या होत्या मात्र तरीही प्रकृतीत सुधारणा झाली नाही आज पहाटे त्यांचे मेडिकल कॉलेज नागपूर येथे निधन झाले आहे त्यांच्या निधनाने प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर, बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या त्यागी विचारांवर वाटचाल करणारा नेता गमावला आहे अशी प्रतिक्रिया देशक गिरीशबाबू खोब्रागडे यांनी दिली आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन बागडे यांनी दिली आहे