‘दृष्यम’ स्टाईलने केलली प्रेयसीची हत्या; सिमेंटचे प्लास्टर करून पुरला मृतदेह.

52

‘दृष्यम’ स्टाईलने केलली प्रेयसीची हत्या; सिमेंटचे प्लास्टर करून पुरला मृतदेह.

 'Visual' style murder of Kelly Beloved; Bodies buried by cement plaster.
‘Visual’ style murder of Kelly Beloved; Bodies buried by cement plaster.

मध्य प्रदेश:- ‘दृष्यम’ या हिंदी चित्रपटात ज्याप्रकारे एका तरुणाची हत्या करण्यात येते आणि त्यानंतर त्याला पोलिस ठाण्याच्या इमारतीतच पुरण्यात येते, तशाचप्रकारे एक हत्याकांड घडले आहे. मध्य प्रदेशच्या खरगोन येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

संतोष नावाच्या एका व्यक्तीने आपली विवाहित प्रेमिका छायाबाई हिची हत्या करून तिला आपल्याच नव्या घराच्या खडड्यात पुरले. इतकेच नाही तर कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यावर सिमेंटने प्लास्टरही करण्यात आले.

दरम्यान, छायाबाई या त्यांचे वडील भायराम यांच्या मोहनखेडी गावातील राहत्या घरातून 30 डिसेंबरला अचानक बेपत्ता झाल्या. त्यानंतर 3 जानेवारीला नातेवाईकांनी भीकनगाव ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

महिला गायब झाल्यानंतर त्यापाठोपाठ प्रियकर संतोषही गावातून गायब झाला. पोलिस आणि गावकऱ्यांना वाटले की, दोघेही गाव सोडून पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पण कोणताही पुरावा हाती लागला नाही. मात्र 26 जानेवारीला संतोषच्या घराजवळ दुर्गंधी येऊ लागली. याबाबतची माहिती पोलिसांना दिली गेली. त्यानंतर पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेव्हा पोलिसांना एक सिमेंटचे प्लास्टर दिसले. त्यानंतर पोलिसांनी सिमेंटचे प्लास्टर खोदले. तेव्हा त्यांना बांगड्या दिसल्या. आणखी खोदकाम केल्यानंतर पोलिसांना एका महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला.