वाचा बुद्धिमानाने आंबेडकरी नेत्यांनो..
———————————————–
संघ शक्तीने आणि बुद्धिमत्तेने सारे शक्य होईल मात्र कोणी कोणाला कमी लेखू नका.
————————————————-
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
(९०१११९९३३३)
कर्जत :- आपल्या देशात पूर्वजांनी जे काही केले ते बुद्धिमत्तेने आणि संघशक्तीने. त्याचा विसर पडू देऊ नका. शब्दांची बरसात होते पण ज्याचे दुःख त्यालाच असते हे लक्षात ठेवून जगा. आपणच प्रथम नित्य दुसऱ्यांकडे आदराने बघा दुसऱ्याला उत्तेजित करणाऱ्या देशवासीयापासून सावध राहण्याचा सावध राहण्याचा विचार करा. कारण त्यांच्यामुळेच आज देशात नको नको ते घड आले. आणि आज घडत आहे.
वाईट एखादा मूर्ख करतो मूर्ख करतो तर तेव्हा एखादा मूर्ख नको ते बडबडतो पस्तावतो आपण कोण आहोत? कुठल्या पदावर आहोत? त्याचे वाहन न ठेवता सर्वांच्या नजरेतून उतरतो शेवटी त्याने केलेली चूक अथवा वाईट केलेले त्याला जीवनभर सत्वित राहते आणि त्याचा वाईट कृत्या केल्याने त्याचाही शेवट होतो आणि ते पाहून त्याच्याच जवळची माणसं म्हणताना नित्य दिसतात “इथेच करावे आणि इथेच भरावे” तेव्हा विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार विद्वानांचे मेरूमणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशवासी यांना भारतीय संविधानातून समता, शांती, बंधुत्व मैत्री रूपाने संदेश दिलेला आहे. पूर्वजांनी केलेले महान कार्य त्यांची मर्दोमकी त्यांचा त्याग,त्यांची लढाई त्यांचे शौर्य ती सामान्य माणसाची ऊर्जा आहे. ते सहाजिकच आहे त्यांच्या प्रेरणेमुळे त्यांच्या शौर्यतीने व त्यांच्या जयंतीदिनी स्मृतिदिनी आपण आपल्या संघशक्तीचे स्वाभिमानाचे एकजुटीचे भव्य स्वरूपाचे ते कसलीही परवा न करता आपण आपले कर्तव्य बजावतो असे जरी दिसून येत असले तरी आपल्या अस्तित्वाचा विचार करताना कुठे दिसतो? कुठे आपला पक्ष व कुठे आपली धम्म संस्था एकजुटीने धम्माचे पक्षाचे कार्य एकजुटीने करताना दिसते फक्त एकमेकावर टीका करण्यात बुद्धी,शक्ती, युक्ती वाया घालवण्यामध्ये आम्हाला समाधान वाटते. वास्तविक पाहिले तर आमचे पॅंथर काळातले साहित्यिक बुद्धिमान नेते वय झाल्यामुळे आपल्या नव्या पिढीचे काय व्हायचे?. आपल्या राजकीय धार्मिक सामाजिक आणि साहित्य चळवळीचे आंबेडकरी पत्रकारितेचे काय व्हायचे?. त्याबाबतीत चे लिखाण तर करीत नाहीतच पण आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनाही समजावताना दिसत नाहीत. अहो काय तुमच्या त्या अनुभवाचा बुद्धिमत्तेचा उपयोग फक्त कुणी विरोधात बोलताना दिसले की तेवढ्यापुरती चर्चा स्वरूपात बोलायचे. आपले सारे सांभाळून आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरलेली दिसते. ती खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाचे पालन करताना दिसते. आंबेडकरी समाजच असा आहे वाईट कुणी कुठल्या समाजातील माणसाचे केल्याचे कळताच हा समाज जात धर्म न पाहता पेटून उठते. सर्वप्रथम निषेध करतो दलित पिढी शोषित बहुजनांचे दुःख ते आपले दुःख समजून निषेध व्यक्त करून रस्त्यावर उतरतो. कारण तो बौद्ध समाजाचा विचार न करता सर्वांसाठी झटतो भारतीय संविधानाच्या आधाराने हा समाज न्यायासाठी झगडताना दिसतो असे असताना काही जण त्यांची जाण ठेवतात तर काहीही जाण ठेवताना दिसत नाहीत. त्याचे दुःख होते असो आज ना उद्या त्यांना कळेल आपले कोण जवळचे आहेत. ते असो मी देखील दलित पॅंथर चळवळ जवळून पाहिले आहे. त्या चळवळीचे प्रमुख नेते माननीय भाई नामदेव ढसाळ, माननीय राजाभाऊ ढाले माननीय प्राध्यापक अरुण कांबळे माननीय मनोर अंकुश, माननीय भाई संघारे माननीय रामदास आठवले, माननीय गंगाधर गाडे ,माननीय तानसे ननावरे, माननीय अविनाश मातेकर आणि साहित्यिक माननीय ज वी पवार साहेब यापैकी काहींनी पॅंथर चळवळीचे काम करताना विचार व्यक्त केले तर काहींनी नेते व काहींना नेते पद शोभून दिसत होते. काहींना संगत सोडली तर काहींनी संगत मजबूत केली. त्यांची शेवटपर्यंत जाण ठेवली माननीय रामदास आठवले साहेबांनी. हे सर्वांना मान्य करावे लागेल सर्व आंबेडकरी नेत्यांना. आज तीनच दिग्गज नेते आहेत. माननीय वकील प्रकाश आंबेडकर साहेब माननीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आणि माननीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे साहेब यांनी प्रथम एकत्रित बसून विचार करावा ही बंधूंची विनंती.
बंधू लक्ष्मण अभंगे
(साहित्यिक)
७८८७४३१९७५