‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमानिमित्त जिल्हा ग्रंथालय कार्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
मनोज एल खोब्रागडे
✍️सह संपादक✍️
मो 8208166961
परभणी, दि. 30 :- ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आज सोमवार (दि. 30) रोजी विविध विषयावरील ग्रंथाचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी यांच्या हस्ते झाले.
श्री. परदेशी यांनी सर्व विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व, वाचनाची आवड कशी निर्माण करावी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालासाहेब देवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन गायकवाड यांनी व्यक्त केले. त्यावेळी परभणी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.
ग्रंथ प्रदर्शन 31 डिसेंबर, 2024 पर्यंत सुरू राहनार आहे. कार्यक्रमावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी व वाचकप्रेमींनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा व वाचक सभासद नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालासाहेब देवणे यांनी केले.