चंद्रपूरात वाघनखांसह दोघांना अटक
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 31 डिसेंबर
चंद्रपूर महानगरालगतच्या लोहारा गावात वाघ नखांसह दोन आरोपींना अटक करण्यात वनविभागाला यश आले. ही कारवाई रविवार, 30 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी जी.आर. नायगमकर यांनी दिली. याप्रकरणी आरोपींनी वनकोठडी सुनावण्यात आली आहे. पसार आरोपींचा शोध वनविभाग घेत आहे.
संदीप हरी तोडासे, शेखराम किसन कुळमेथे असे अटकेतील आरोपींचे नावे असून, ते लोहारा येथील रहिवासी आहेत. आरोपींनी अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाघनखे आणल्याची माहिती वनविभागाला मिळाली. माहितीच्या आधारे आरोपीच्या घरी धाड टाकून चौकशी केली असता, त्यांनी सर्व मुद्देमाल मिळाला. त्यांच्याविरूद्ध वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे, विभागीय वनअधिकारी निकिता चौरे, सहायक वनसंरक्षक विकास तरसे, मध्य चांदाचे आदेश शेंडगे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी आर. नायगामकर क्षेत्र सहायक ए. पी. तिजारे, एच. पी. डोंगरे, वनरक्षक कविता यादव, पी.ए.कोडापे, पी.बी.बोबाटे, जि.एल. यादव, एस.पी. पारवे, एस.एम. मट्टामी यांनी केली.