तबलावादक किशोर भवारे यांना आर्ट बिट्स महाराष्ट्र कला पुरस्कार प्रदान
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333
कर्जत : – कला क्षेत्रात उत्कृष्ट तबलावादक कलाकार म्हणून किशोर भवारे यांना उत्कृष्ट तबलावादक म्हणून राज्यस्तरीय कला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तबला विशारद अनिल गावडे हे त्यांचे गुरुवर्य असून मुंबई येथे पाच वर्ष तबल्याचे शिक्षण घेणारे किशोर भवारे हे ग्रामीण भागात राहणारे मौजे वंजारपाडा, तालुका- कर्जत, जिल्हा-रायगड यांनी रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी गायकांना तबल्याची साथ देत आले आहेत.ह्या आधी २०२१ मध्ये पखवाज वादक म्हणून ही त्यांना पुरस्कार मिळाला होता. पुन्हा एकदा २०२३-२४ आर्ट बिट्स महाराष्ट्र कला राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.
तालुक्यातील भजनी कलावंतांनी आणि मुख्य म्हणजे वंजारपाडा गावकऱ्यांच्या पाठिंबामुळे नेहमीच ऊर्जा मिळाली आहे म्हणून त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.
इतर तरुणांनी सुद्धा आपली कला फक्त स्वप्नात न ठेवता त्याचा साठी परिश्रम घेऊन ते स्वप्न पूर्ण करावे. आपण निवडलेल्या कलेमध्ये वेगळाच आनंद मिळतो.