रुफस, डस्टी श्‍वानची सुवर्ण कामगिरी

रुफस, डस्टी श्‍वानची सुवर्ण कामगिरी

रुफस, डस्टी श्‍वानची सुवर्ण कामगिरी

रुफस, डस्टी श्‍वानची सुवर्ण कामगिरी

रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: रायगड पोलीस दलातील श्‍वान पथकातील रुफस व डस्ट श्‍वानही कामगिरी बजावत पोलीस दलाचे नाव उंचावत आहे. पालघर येथे झालेल्या 19 व्या कोकण परिक्षेत्र पोलीस दलातील कर्तव्य मेळाव्यात श्‍वान पथकाची स्पर्धा पार पडली. यामध्ये रुफस व डस्टी या श्‍वानांनी सुवर्ण कामगिरी बजावली आहे. अंमली पदार्थ व स्फोटक शोधक स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याने त्यांना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सन्मानाने रायगड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

रायगड पोलीस दलामध्ये दोन हजारहून अधिक पुरुष व महिला अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. उपोषण, मोर्चे, आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवत ण्याचे काम करीत असताना जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न त्यांच्या मार्फत कायमच होत आहे.

पोलीस दलात श्‍वान पथक एक स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. चोरी, घरफोडीसह खून अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यामध्ये श्‍वान पथकातील रॉकी, ऑस्कर तसेच रुफस, डस्टी आदी श्‍वानांनी केले आहे. पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात श्‍वान पथक मदत करीत आहे. पेण येथे झालेल्या घरफोडीतील गुन्ह्याची उकल करण्यामध्ये मर्फी श्‍वानाचे योगदान राहिले आहे. महाड येथील खूनाचा गुन्हा ऑस्कर श्‍वानमार्फत उघडकीस करण्यात आला आहे. त्यामुळे श्‍वान पथकातील वेगवेगळ्या श्‍वानांनी कर्तव्य बजावत वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे.

पालघर येथे कोकण परिक्षेत्रीय पोलीस दलातील कर्तव्य मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात श्‍वानांची स्पर्धा घेण्यात आली. अंमली पदार्थ स्पर्धेत रुफस श्‍वान व स्फोट शोधक स्पर्धेत डस्टी श्‍वानने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे त्यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले.