बायकोच्या जाचाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या,पोलिसाना मिळाली चिट्ठी.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी.
📞 7304654862 📞
मुंबई :- दहिसर मधे बायकोच्या जाचाला कंटाळून नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पंचनाम्यानंतर एक चिट्ठी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर हा प्रकार उघडीस आला.
दहिसर पूर्वेच्या रावलपाडा क्षेत्रातील स्नेहसदन चाळीत राहणाऱ्या सुशील म्हामुणकर (42) 13 नोव्हेंबर रोजी घरात गळफास घेऊन आत्मत्या केली होती. त्याच्या अंत्यसंस्कारंनंतर दहिसर पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये सुशील ची वही सापडली होती. त्या वहीमध्ये त्याने बायकोच्या मानसिक, आर्थिक, शारीरिक जाचाला कंटाळून आत्मत्याचे पाऊल उचलत आहे, हे नमूद केले होते. या प्रकरणी सुशील चे वडील खंडेराव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 2 जानेवारी ला वैशाली अडिलकर ( 48 ) हिच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.
वैशाली हि सुशिलसोबत छोट्या – छोट्या गोष्टींवर वाद घालत होती, त्याच्याकडे वारंवार पैशेची मांगणी करायची, व त्या पैशांचा हिशोब मागितला तर सुशील ला शिवीगाळ करायची, असे तक्रारीत नमूद केले आहे.
व त्याला एकट्याला सोडून न सांगता माहेरी निघून जायची, तिची मागणी म्हणजे सुशील च्या वडिलांच्या नावावर जे घर होते ते ती तिच्या नावावर करण्यावर ती सारखी त्याच्यामागे तगादा हट्ट लावत होती.
ऑक्टोबर मधे वैशाली सुशील सोबत त्याच कारणावरून वाद घालून माहेरी निघून गेली. वैशाली परत घरी यावी त्यासाठी सुशील ने खूप प्रयत्न केले पण वैशाली ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती, ती त्याच काहीच ऐकत नव्हती, अस्वस्थ होऊन सुशील ने स्वत चा जीवन संपवण्याचं ठरवलं, आणि सुशील ने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. असा आरोप सुशील च्या वडिलांनी केला आहे.