महाराष्ट्रातील 62 बेटांवर ध्वजारोहण

121
महाराष्ट्रातील 62 बेटांवर ध्वजारोहण

महाराष्ट्रातील 62 बेटांवर ध्वजारोहण

महाराष्ट्रातील 62 बेटांवर ध्वजारोहण

तटरक्षक दल, भारतीय नौसेना, स्थानिक प्रशासनाचे सक्रिय योगदान
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:देशाच्या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातील समुद्रकिनार्‍यांवरील 62 बेटांवर ध्वजारोहण केले जाणार आहे. हा ऐतिहासिक उपक्रम तटरक्षक दल, नौदल, मुंबई पोर्ट ट्रस्ट, सागरी महामंडळ स्थानिक प्रशासनाच्या मदतीने राबवला जाणार आहे. या उपक्रमाची तयारी सुरू झाली असल्याची माहिती सागरी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या सागरी किनार्‍याची लांबी सुमारे 750 किमी आहे. हा किनारा भारताच्या पश्‍चिमी किनारपट्टीवर स्थित आहे. सुंदर समुद्रकिनारे, लहान-मोठी बेटे आणि ऐतिहासिक किल्ले आहेत. महाराष्ट्राचा सागरीकिनारा केवळ भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनदेखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भारत सरकारने यापूर्वी हर घर तिरंगा उपक्रम राबवला होता. एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देशभर पोहोचवण्यासाठी 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 62 बेटांवर ध्वजारोहण करण्यात येईल.

ध्वजारोहणाच्या तयारीच्या दृष्टीने स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांनी तयारी सुरू केली आहे. बेटांवर सफाई आणि सुरक्षा तपासणी करण्याच्या कामांना गती दिली आहे. यामध्ये सर्व बेटांवर आवश्यक ध्वजारोहणाची तयारी केली जात असल्याची माहिती सागरी महामंडळाकडून देण्यात आली आहे. अभिमान जागरूक हा उपक्रम महाराष्ट्राच्या समुद्रकिनार्‍यांवरील बेटांची महत्त्वाची जाणीव करण्यासाठी एक आदर्श ठरेल. त्याचबरोबर या उपक्रमामुळे लोकांमध्ये राष्ट्रीय एकतेचा, भारतीय संस्कृतीचा आणि भारताच्या महासागरी सीमांचा अभिमान जागरूक होणार आहे.

महाराष्ट्रातील
सागरी बेटे
एलिफंटा बेट (घारापुरी)-मुंबई,
सिंधुदुर्ग किल्ला (सिंधुदुर्ग बेट) – सिंधुदुर्ग,
खांदेरी बेट (कांजा बेट) – मुंबई,
उंदेरी बेट – मुंबई,
मुरुड-जंजिरा बेट – रायगड,
निवती बेट – सिंधुदुर्ग,
तारकर्ली बेट – सिंधुदुर्ग,
सिंधुदुर्ग बेट – सिंधुदुर्ग,
द्वारका बेट -रत्नागिरी,
उरण बेट – रायगड,
मालवणी बेट, दाभोळ बेट