बहुजन हितकरीणी सभा आगामी नववर्षाच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न…

बहुजन हितकरीणी सभा आगामी नववर्षाच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न...

बहुजन हितकरीणी सभा आगामी नववर्षाच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न…

बहुजन हितकरीणी सभा आगामी नववर्षाच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न...

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव:- रायगड आगामी सन २०२५ सालच्या माहितीपूर्ण सुबक दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) बहुजन हितकारीणी सभा चे संस्थापक रवींद्र जाधव, कायदेशीर सल्लागार अँड.पी. टी.मालोरे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष किशोर शिर्के, संजय जाधव, माणगांव तालुका कोषध्यक्ष जनार्दन सावंत, किशोर शिर्के, विनोद जाधव, हिरु शिर्के, मंगेश पवार, प्रदीप जाधव, कमलेशदादा पवार,सुरेश साळवी,जयराम जाधव, विजय शिर्के, लक्ष्मण जाधव,राजेश सावंत,पत्रकार सचिन पवार व आदी मान्यवर यांच्या उपस्थितीत संस्थेच्या कार्यालयात सोमवार दि.०७ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आगामी सन २०२५ सालच्या अत्यंत माहितीपूर्ण व सुबक अश्या दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) माणगांव येथील जे. बी डी प्लाझा मुंबई गोवा हायवे येथे प्रकाशन करण्यात आले आहे.

माणगांव तालुका कार्यक्षेत्र मर्यादित संस्थेची स्थापना २०१६ साली झाली आहे,कायम नफ्यात असलेल्या बहुजन हितकारणी आजवर अनेकांना शैक्षणिक, व्यावसायिक, प्रासंगिक अडीअडचणीमध्ये मदतीला धावून गेलेली आहे. या लाभदायी संस्थेने क्षेत्रांतील अनेक चढ-उतार व प्रतिकुल काळातही आपला लौकिक टिकवून आज लेखापरीक्षण वर्ग ‘अ ‘ दर्जा प्राप्त केला आहे. संस्थेचे संस्थापक श्री.रवींद्र दाजी जाधव यांच्या मार्गदर्शनात तसेच कायदेशीर सल्लागार अँड. पुंडलिक मालोरे व किशोर शिर्के व सर्व सभासद यांनी भविष्यात बहुजन हितकारिणी सभा चे आणखीन शाखा रायगड जिल्ह्यातील काना कोपऱ्यात करण्याचे प्रस्तावित उद्दिष्ट आहे.बहुजन हितकारीणी सभा चे आगामी नववर्ष सन २०२५ सालच्या सुबक दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना मान्यवर दिसत आहेत.