जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सिंदेवाही नगरपंचायत कडे चाम्पियन ट्रॉफी

31
जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सिंदेवाही नगरपंचायत कडे चाम्पियन ट्रॉफी

जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सिंदेवाही नगरपंचायत कडे चाम्पियन ट्रॉफी

जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सिंदेवाही नगरपंचायत कडे चाम्पियन ट्रॉफी

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी
मो 880689909 
सिंदेवाही :- महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग तर्फे जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोस्तव-२०२५ नुकताच ब्रम्हपुरी या ठिकाणी पार पडला असून या महोत्सवात सिंदेवाही – लोणवाही नगरपंचायतला विविध स्पर्धेत विजयी प्राप्त केले असल्याने चाम्पियन ट्रॉफी प्राप्त झाली आहे.
राज्याच्या नगरविकास खात्यामार्फत दरवर्षी जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव घेण्यात येत असून यावर्षीचा जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव महोत्सव ब्रम्हपुरी येथे घेण्यात आला असून या महोत्सवात जिल्हामधून एकूण १७ स्थानिक स्वराज्य संस्थानी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये सिंदेवाही – लोणवाही नगरपंचायत सुद्धा सहभागी झाली असून विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. यामध्ये १०० मीटर धावण्याची स्पर्धा यामध्ये संजय वाकडे, बॅडमिंटन स्पर्धा यामध्ये राजेश चौधरी, तर गायन मध्ये प्रफुल वाकडे ,नाटक मध्ये सुधाकर निकुरे यांनी गुणानुक्रम पटकाविला आहे. जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सिंदेवाही – लोणवाही नगरपंचायतला चाम्पियन ट्रॉफी प्रदान करण्यात आली आहे. या यशा बद्धल, नगरपंचायत चे मुख्याधिकारी राहुल दि. कंकाळ, नगराध्यक्ष भास्कर नन्नावार , उपाध्यक्षा पूजा विलास रामटेके, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान सदस्य स्वप्निल कावळे, नगरपंचायतीचे सदस्य मयूर रमेश सुचक , दिलीप भिवाजी रामटेके , पंकज प्रभुदास नन्नेवार,, वैशाली संजय पुपरेड्डीवार, मिनाक्षी संजय मेश्राम, शाम परमानंद छत्रवाणी, अमृत भास्कर मडावी, युनूस हबीब शेख . अंजू नरेंद्र भैसारे, निता भगवान रणदिवे, श्वेता संजय मोहुर्ले, .अस्मिता जुमनाके .अपूर्वा चिंतलवार .किशोर भरडकर .दीपा पुस्तोडे तसेच नगरपंचायत चे अधिकारी – कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे अभिनंदन केले. सदर स्पर्धेमध्ये चॅम्पियन चषक मिळविण्यासाठी सुरज गायकवाड, मनोज आंबोरकर , .नूतन कोरडे, विनोद काटकर, संदीप कांबळे, सुधिर ठाकरे, अनिकेत मानकर , संजय वाकडे, संजय रामटेके, सुधाकर निकुरे , पुरुषोत्तम खोब्रागडे, संजय बोन्द्गगुलवार , नंदू सरवरे, चेतन राऊत ,प्रीतम खोब्रागडे , प्रतिक जस्वाल , दिलेश सहारे, प्रफुल वाकडे भूपेश मेश्राम .आकाश ठाकरे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.