रायगड जिल्ह्यातील लाचखोरांना एसीबीचा दणका

89
रायगड जिल्ह्यातील लाचखोरांना एसीबीचा दणका

रायगड जिल्ह्यातील लाचखोरांना एसीबीचा दणका

रायगड जिल्ह्यातील लाचखोरांना एसीबीचा दणका

वर्षभरात सात जणांविरोधात कारवाई
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: वेगवेगळ्या कारणांवरून लाच मागणार्‍या लाचखोरांना रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दणका दिला आहे. वर्षभरात सात जणांविरोधात कारवाई करून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये शिक्षण विभागातील कर्मचार्‍याला 40 हजार रुपये आणि वित्त विभागातील कर्मचार्‍याला 81 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

वेगवेगळे दाखले, परवानगीसाठी शासकीय कार्यालयात अर्ज केला जातो. त्यानंतर त्याची पडताळणी करून संबंधित विभागातील कर्मचारी व अधिकार्‍यांमार्फत अर्जदाराला दाखला व परवानगी मिळते. परंतु, जिल्ह्यातील काही शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी लाच घेऊन काम करतात. सर्वसामान्यांना हा प्रकार कायमच डोकेदुखी ठरत आहे. आपले काम वेळेत होत नसल्याने अर्जदारांमध्ये त्या पद्धतीविरोधात प्रचंड संताप निर्माण होतो. वारंवार फेर्‍या मारूनदेखील काम होत नसल्याने संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात नाराजीचे सूर उमटतात.

ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद व अन्य शासकीय कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांपासून अधिकार्‍यांपर्यंत लाच घेऊन काम करण्याचा प्रकार रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जिल्ह्यात कार्यरत आहे. ही एक स्वतंत्र यंत्रणा असून, या यंत्रणेमार्फत सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.

लाचलुचपत प्रतिबंधक, रायगड विभागामार्फत लाच घेणार्‍यांवर अंकुश ठेवण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो. फलक, पत्रक वाटप अशा वेगवेगळ्या उपक्रमांमधून जनजागृती करण्याचा प्रयत्न होत आला आहे. तरीदेखील काहींनी काम पूर्ण होण्यासाठी लाचेची मागणी केली आहे. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दणका मिळाला आहे.

जानेवारी ते डिसेंबर 2024 या वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सात ठिकाणी सापळे रचून लाच घेणार्‍यांना रंगेहाथ पकडले आहे. त्यामध्ये महसूल विभागातील दोन, शिक्षण विभागातील दोन, वित्त विभागातील एक, ग्रामपंचायतीमधील एक व पोलीस विभागातील एकाचा समावेश आहे. पोलीस विभागातील कर्मचार्‍याने दाखल झालेल्या तक्रारीवरून कारवाई न करण्यासाठी लाच घेतली होती. शिक्षण विभागातील कर्मचार्‍याने बिल मंजुरीसह पगार देण्यासाठी लाच मागितली होती. ग्रामसेवकाने नोंद करण्यासाठी लाच घेतली घेतली होती.

या कारवाईमुळे लाच घेणार्‍यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात वेगवेगळ्या कामांसाठी लाच मागणार्‍या लोकसेवकांविरोधात तक्रार देण्याचे आवाहन उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.

वर्षभरात लाच घेणार्‍यांविरोधात वर्षभरात सात कारवाया झाल्या आहेत. कोणीही लोकसेवक लाच मागत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. तसेच कोणाला लाचही देऊ नये.

– शशिकांत पाडावे, उपअधीक्षक
लाचलुचपत प्रतिबंधक, रायगड विभाग