मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर पिस्तूल दाखवून शिवसैनिकांनी केली गाडी ओव्हरटेक.

52

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर पिस्तूल दाखवून शिवसैनिकांनी केली गाडी ओव्हरटेक.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर असलेल्या वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी एक कारचालक व त्याचा सहकारी इतर वाहनचालकांना चक्क पिस्तुलाचा दाखवत असल्याचं समोर आलं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर हा प्रकार घडला असून याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. पिस्तूलबाज वाहनचालकाच्या गाडीवर शिवसेनेचा लोगो असल्यानं उलट सुलट चर्चेला उधाण आलं आहे मात्र ह्या व्हिडिओमधून सत्तेत असूनही शिवसैनिक इतके बेजबाबदारपणे वागत असल्यावरून देखील जोरदार टीका होत आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडल्याचा जलील यांचा दावा आहे. ‘ महाराष्ट्रातील पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील हे चित्र आहे. वाहनावरील लोगो सर्व काही सांगून जातो. शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी वाट काढत असताना रिव्हॉल्व्हरचं ब्रँडिंग करीत होता. राज्याचे गृहमंत्री व पोलीस महासंचालक याची दखल घेतील का,’ असा सवाल जलील यांनी केला आहे.