ममदापुर मधील अनधिकृत दुकान गाळ्यांचे बांधकाम सुरूच… नेरळ विकास प्राधिकरणाची केवळ बघ्याची भूमिका?

50
ममदापुर मधील अनधिकृत दुकान गाळ्यांचे बांधकाम सुरूच... नेरळ विकास प्राधिकरणाची केवळ बघ्याची भूमिका?

ममदापुर मधील अनधिकृत दुकान गाळ्यांचे बांधकाम सुरूच… नेरळ विकास प्राधिकरणाची केवळ बघ्याची भूमिका?

ममदापुर मधील अनधिकृत दुकान गाळ्यांचे बांधकाम सुरूच... नेरळ विकास प्राधिकरणाची केवळ बघ्याची भूमिका?
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333

कर्जत: नेरळ विकास संकुल प्राधिकरण हद्दीतील ममदापूर ग्रामपंचायतमध्ये नियोजित मुख्य रस्त्यात अनधिकृत दुकान गाळ्यांचे बांधकाम सुरू आहे. त्याबाबत तक्रार केल्यानंतर नेरळ विकास प्राधिकरणाच्या पत्रांना केराची टोपली दाखवीत येत आहे.त्यामुळे बांधकाम व्यावसायिकाचे अनधिकृत काम जोरात करीत आहे आणि त्यामुळे नेरळ विकास संकुल प्राधिकरणाचा अशा अनधिकृत बांधकाम यांना पाठिंबा आहे काय? अशी चर्चा सुरु आहे.
नेरळ ममदापूर येथील सुकून रेसिडेन्सी या प्रोजेक्ट चे मे.रिफा स्ट्रक्चरल सोल्युशन तर्फे डायरेक्टर अतिउल्ला खान यांच्या माध्यमातून नेरळ ममदापूर मुख्य रस्त्यात अनधिकृत बांधकाम केला जात आहे.नेरळ प्राधिकरण मधील कोणत्याही ग्रामपंचायत मधील बांधकाम यांना परवानगी प्राधिकरण देत असते.मात्र अतिउल्ला खान यांच्या पर्यंत आतापर्यंत कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही.ममदापुर गावातील नेरळ ममदापूर मुख्य रस्त्यात सध्या अनधिकृत दुकान गाळ्यांचे बांधकाम केले जात आहे. मुख्य रस्ता आणि तक्रारदार राहील शेख यांच्या जागेच्या काही भागात अतिक्रमण केले आहे. त्यासंबंधी राहील शेख यांनी तक्रार केली असता सदर व्यवसायिकास नेरळ विकास प्राधिकरण यांचे कडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र सदर नोटीसला नेरळ विकास संकुल प्राधिकरण कडून केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे सध्या त्या ठिकाणचे बांधकाम जोरात सुरु आहे.
नेरळ विकास प्राधिकरणाचे तांत्रिक अधिकारी उप अभियंता निलेश खिल्लारे यांच्याकडे केली आहे.तक्रार दाखल केल्यानंतर नेरळ विकास प्राधिकरण चे तांत्रिक अधिकारी यांनी केवळ कागदोपत्री पाहून घेतली आहेत.मात्र प्राधिकरण हद्दीतील रस्त्याच्या जागेत अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली नाही.तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार ते वारंवार पाठपुरावा करीत असून देखील अधिकाऱ्यांची उदासीनता दिसून येत आहे. ते सदर अनधिकृत बांधकामास पाठीशी घालत आहेत. अनधिकृत बांधकाम केव्हा पाडले जाईल? ते नक्की पाडणार आहात की नाही? अधिकाऱ्यांना कारवाईस करण्यासाठी एवढा वेळ का लागतो? असे अनेक प्रश्न तक्रारदार यांनी उपस्थित केले आहेत.

राहील शेख.. तक्ररदार आम्हाला बांधकाम परवानगी किंवा भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.त्यावेळी सर्व अधिकृत असून देखील छोट्या छोट्या गोष्टींसाठी अधिकाऱ्यांच्या दालनात पायपिट करावी लागते. मात्र सदर व्यवसायिकाने रस्त्यात व माझ्या जागेत अतिक्रमण करून देखील आमच्या वारंवार मागणी नंतर सुद्धा त्यावर कारवाई केली जात नाही यावरून अधिकारी यांची मानसिकता दिसून येत आहे.