सुमारे ६० लक्ष रुपये खर्च करून पूर्ण केलेल्या रस्त्याच्या कामाचा “माननीय नामदार भरत शेठ गोगावले” यांच्या शुभहस्ते लोकार्पण…
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड -ता. माणगाव पळसगाव खु. मुळगाव जोड रस्ता माननीय नामदार भरत शेठ गोगावले यांच्या पाठपुराव्याने मंजूर करून आणण्यात आलेल्या अंदाजे ६० लक्ष रुपये खर्च करून डांबरीकरण पूर्ण केलेल्या रस्त्याच्या कामाचा लोकार्पण समारंभ संपन्न झाला ,
माणगाव तालुका ग्रुप ग्रामपंचायत गांगवली पळसगाव खुर्द येथील पूर्ण केलेल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज ग्रामस्थ महिला भगिनी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. सदर रस्ता अर्थसंकल्प योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित विभागातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी उपस्थित उप जिल्हा प्रमुख सुरेश महाडिक युवा सेना सचिव अच्युत तोंडलेकर उप सरपंच अनिल वणगुले, तसेच माजी उप तालुका प्रमुख नितीन पवार, इत्यादी उपस्थित होते.