कोंच पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक इम्रान खान यांनी गुरुवारी सांगितलं की, कोंच भागातील भगत सिंह नगरमधून रामबिहारी राठोड 65 याला बाल लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या घरातून लॅपटॉप आणि हार्ड डिस्कमध्ये 15 ते 20 अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. या व्हिडीओमध्ये आरोपी लहान मुलांसोबत अत्यंत घृणास्पद कृत्य करीत असल्याचे दिसत आहे.
पोलिसांच्या सायबर क्राईमच्या टीमकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. एसएचओ यांनी सांगितलं की, राठोड सुरुवातीला पैशांचं आमिष दाखवून लहान लहान मुलांना आपल्या जाळ्यात खेचत होता आणि त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करुन व्हिडीओ तयार करुन त्याच्याआधारे त्यांना ब्लॅकमेल करीत होता. तो लहान लहान मुलांना धमकी देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. राठोड याला तुरुंगात पाठविण्यात आलं असून पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहे.