खलिस्तानी दहशतवादी जशनप्रीत सिंग याला घुग्घूस येथे अटक?
प्ररप्रांतीयांच्या सतत आगमनाने शहराची सुरक्षा धोक्यात?
🖋️साहिल सैय्यद /प्रतिनिधि
📲.9307948197
घुग्घूस : हा चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर या शहराला मिनी इंडिया असे संबोधले जाते.
शहराचा हा गौरव आज शहराच्या सुरक्षितते करीता धोक्याची घंटा ठरत आहे.
शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी शहरातील लॉयड्स मेटल्स कंपनीत काम करणाऱ्या जशनप्रीत सिंग या वीस वर्षीय युवकांला पंजाब पोलीस व महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त दलाने मोठ्या शिताफिने अटक केली.
जशनप्रीत हा कुख्यात खलिस्तानी या दहशतवादी संघटनेचा मोस्ट वॉन्टेड आरोपी असून त्याच्यावर पंजाब येथील अमृतसर पोलीस चौकीवर हॅन्ड ग्रॅनेड फेकल्याचा तसेच बाईकचोरी, अंमली पदार्थची विक्री असे अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे.
10 जानेवारी रोजी शहरात राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होता आणि याच दिवशी दहशतवादी संघटनेचा संशयित आरोपी अटक होने हे धोखादायक बाब आहे.
घुग्घूस शहरात सध्या लॉयड्स मेटल्स कंपनी, एसीसी अदानी कंपनी, हेच. आर. जी. ट्रान्सपोर्ट कंपनी, पैनगंगा कोळसा खाण या परिसरात हजारोच्या संख्येने परप्रांतीय मजूर आलेले आहे.
कमी मजुरीत काम करणारे आणि महिनो महिने गावाकडे न जाणारे या स्वस्त मजुरामुळे कंपनीला मोठा लाभ होत असल्यामुळे या कंपन्या स्थानिक रोजगारांना रोजगार देण्यासाठी टाळाटाळ करतात.
यामुळे परिसरातील स्थानिक युवकांना रोजगार मिळत नाही आणि यांच्या मोकाट वास्तव्याने शहरातील सुरक्षेला धोखा निर्माण झालेला आहे.
या शहरात येणाऱ्या प्रत्येक मजुरांची पोलीस पळताळणी अंत्यन्त आवश्यक असून ज्या कंपन्या अश्या जाच पाळताळणीला सहकार्य करीत नसेल त्यांच्यावर ही कारवाई होने आवश्यक आहे.
आधार आणून ध्यावे :शाम सोनटक्के
शहरातील पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांनी खलिस्तानी दहशतवादी यांच्या अटके नंतर शहरातील सर्व कंपन्याना निर्देश दिले आहे की कंपनी मध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांचे आधारकार्ड पोलीस स्टेशनला आणून द्यावे जेणेकरून त्या कामगारांची ओळख पटावी व गुन्हेगार स्वरूपांच्या लोकांवर कारवाई करता येईल मात्र यावेळी ही ओळख परेड अंत्यन्त कसून करावी अशी नागरिकांची मागणी आहे