रस्ता सुरक्षा अभियान २०२५, नेरळ युनिट तर्फे जनजागृती
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
नेरळ:- “रस्ता सुरक्षा अभियान २०२५” हे भारत सरकारने रस्ते सुरक्षा आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरु केलेले एक महत्त्वाचे अभियान आहे. या अनुषंगाने नेरळ पोलीस ठाणे यांच्या वतीने या मोहिमेचा मुख्य उद्देश रस्त्यावरील अपघातांमध्ये होणारी मृत्यू आणि अपघात कमी करणे, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना रस्ता सुरक्षा नियमांची जाणीव करून देणे आणि रस्ते सुरक्षित करण्यासाठी विविध उपाययोजना राबवणे या बाबत नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील जय मल्हार रिक्षा चालक-मालक सामाजिक मंडळ नेरळ पूर्व या भागात या अभियानाच्या अंतर्गत सरकारच्या विविध उपाययोजना बाबत माहिती दिली. रस्ते आणि वाहतूक सुरक्षा सुधारण्यासाठी उपाय योजना समजवण्यात आल्या. वाहनचालकांसाठी शिक्षण व जनजागृती मोहिमा अत्याधुनिक रस्ता सुरक्षा उपायांचा वापर. सुरक्षिततेसाठी नवीन तंत्रज्ञानाचा समावेश. ट्राफिक नियमांचे कठोर पालन सुनिश्चित करणे.
या अभियानाच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा आणि वाहन अपघातांच्या बाबतीत जनजागृती वाढविणे आणि लोकांच्या जीवनाचे संरक्षण करणे हे उद्दिष्ट आहे.
रस्ते आणि वाहतूक सुरक्षा सुधारण्यासाठी जिल्हा पोलीस वाहतूक शाखा सोमनाथ लांडे व नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाय योजना समजवण्यात आल्या असून या वेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पो. उपनिरीक्षक नरेश नांदगावकर व वाहतूक स.पो. निरीक्षक नितीन अहिरे यांनी मार्गदर्शन केले.
या अभियानाच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा आणि वाहन अपघातांच्या बाबतीत जनजागृती वाढविणे आणि लोकांच्या जीवनाचे संरक्षण करण्याचे हे उद्दिष्ट आहे असे नांदगावकर यांच्याकडून सांगण्यात आले.