जलजिवन मिशन अंतर्गत, जल साक्षरता अभियान प्रशिक्षणा मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी ठरत आहेत अडसर
जितेंद्र नागदेवते-
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909
सिंदेवाही :- पंचायत समिती सिंदेवाही सभागृहात जलजिवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत व गावस्तरीय समिती, जल साक्षरता अभियान दिनांक २/१/२०२५ ते ७/१/२०२५ पर्यंत राबविण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जलजिवन मिशन अंतर्गत, ग्रामपंचायत व गावस्तरीय समिती सदस्याचे, जल साक्षरता अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानामध्ये ग्रामपंचायत सरपंच, सदस्य गावातील आशा वर्कर, तसेच गावातील ईतर समित्यांचे पदाधिकारी उपस्थित राहून, पाणीपुरवठा व स्वच्छता या बाबतीत माहिती आत्मसात करून, गावातील जनतेला याचा प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे परंतु या अभियानात पहिल्या दिवशीच ग्रामपंचायत पदाधिकारी यांची अनुपस्थिती होती यावरून या अभियानाला ग्रामपंचायत पदाधिकारीच अडसर ठरत आहेत असे दिसून येते. या कार्यक्रमाला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या संपूर्ण ग्रामपंचायत स्तरावरून केवळ १५ ते २० व्यक्ती उपस्थित राहत होते. तसेच या अभियानात सहभागी नसलेल्या व्यक्तीचे आधार कार्ड नंबर घेऊन, त्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्याचे माहिती मिळाली आहे. तसेच या जल मिशन अंतर्गत प्रशिक्षण देणाऱ्या व्यतीरिक्त दुसरे कोणतेही अधिकारी/ कर्मचारी वर्ग उपस्थित नव्हते. यावरून जल मिशन अंतर्गत जल साक्षरता अभियान प्रशिक्षण राबविण्याचा फज्जा उडाला आहे व सरकारवर अतिरिक्त खर्चाचा भार पडत आहे की काय असे दिसून येते.