जिल्ह्यात नवीन वर्षात 4 वन्यजीवांचा अपघाती मृत्यू

34
जिल्ह्यात नवीन वर्षात 4 वन्यजीवांचा अपघाती मृत्यू

जिल्ह्यात नवीन वर्षात 4 वन्यजीवांचा अपघाती मृत्यू

जिल्ह्यात नवीन वर्षात 4 वन्यजीवांचा अपघाती मृत्यू

📍महामार्गावर उपशमन योजना राबविण्याची मागणी

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 13 जानेवारी
विकासाच्या नावाखाली वन्यजीवांचे भ्रमणमार्ग बाधित झाल्याने अनेक ठिकाणी वन्यजीव अपघाताला बळी पडत आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच 10 जानेवारीला जुनोनाच्या जंगलात एका चितळाला व मूल जवळ डोणी फाट्याजवळ एका सांबराला, 11 जानेवारीला ताडाळी महामार्गावर एका अस्वलीला, तर 12 जानेवारीला घंटा चौकीजवळ महामार्गावर पुन्हा एका चितळाला अपघातात जीव गमवावा लागला. त्यामुळे वन्यजीवांच्या भ्रमण मार्गावर उपशमन योजना राबविण्याची मागणी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीतर्फे करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक रस्त्याचे रुंदीकरणाचे कार्य सुरु आहे. पण वन्यजीवांचा विचार करून उपशमन योजना राबविण्यात आली नाही. वन्यजीवांना खाद्य मिळविण्यासाठी अनेकदा रस्ते ओलांडावे लागतात परिणामी अपघातात त्यांच्या मृत्यू होतो. चंद्रपूर-मूल हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 असून जवळपास जंगलातूनच जातो. हा मार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर ) क्षेत्राला लागून आहे. चंद्रपूर प्रादेशिक व वनविकास महामंडळाचे जंगल क्षेत्र या महामार्गा लगत आहे. त्यामुळे हा महामार्ग ओलांडताना असंख्य वन्यजीवांचा नाहक बळी गेला आहे. मात्र, अद्याप महामार्गावर उपशमन योजना राबविण्यात आलेली नसून, आणखी किती वन्यजीवांचा बळी गेल्यावर शासनाला जाग येणार आहे, असा प्रश्न हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीने उपस्थित केला आहे.