कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान यशस्वीरित्या राबवावे : डॉ. भरत बास्टेवाड

78
कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान यशस्वीरित्या राबवावे : डॉ. भरत बास्टेवाड

कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान यशस्वीरित्या राबवावे : डॉ. भरत बास्टेवाड

कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान यशस्वीरित्या राबवावे : डॉ. भरत बास्टेवाड

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:रायगड जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम अभियान ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान आशा स्वयंसेविका, स्वंयसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेणार असून, रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.१४) जिल्हा परिषदेत आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी मोहिम यशस्वीरित्या राबविण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना डॉ. भरत बास्टेवाड यांनी संबंधितांना दिल्या.

कुष्ठरुग्ण शोध अभियान मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील २३ लाख ५० हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण गृहभेटी देऊन करण्यात येणार आहे. यासाठी १ हजार ६६२ पथके तयार करण्यात आली आहेत. ३३२ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोग संदर्भात संपुर्ण शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. नवीन कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

मंगळवारी पार पडलेल्या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे, सहायक संचालक कृष्ठरोग डॉ. प्राची नेहुलकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी यांच्यासह जिल्हा समन्वय समिती सदस्य उपस्थित होते.
………………….
जिल्ह्यात ४७९ सक्रीय कृष्ठरुग्ण

डिसेंबर अखेर रायगड जिल्ह्यात ४७९ कृष्ठरुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये अलिबाग तालुक्यात २३ कृष्ठरुग्ण असून, कर्जत ७६, खालापूर ४५, महाड ३१, माणगाव ३३, म्हसळा १०, मुरुड ७, पनवेल ग्रामीण ४८, पनवेल शहर ५५, पेण ४४, पोलादपूर ८, रोहा ३८, श्रीवर्धन ८, सुधागड ३२, तळा ५, उरण १६ कृष्ठरुग्ण आहेत.
……………………….
कृष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी १ हजार ६६२ पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातूनजिल्ह्यातील घरोघरी सर्वेक्षण करुन कुष्ठरुग्ण शोध मोहिम काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे. शोध मोहिमेदरम्यान नागरिकांचे कुष्ठरोग आजाराबाबतचे गैरसमज दूर करुन ते बरे होवू शकतात असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करुन कृष्ठरुग्णांना तपासणी व उपचारासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे.
: डॉ. भरत बास्टेवाड
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड.
……………………….