विजयाच्या संकल्पाची मशाल हृदयात करा प्रज्वलित

32
विजयाच्या संकल्पाची मशाल हृदयात करा प्रज्वलित

विजयाच्या संकल्पाची मशाल हृदयात करा प्रज्वलित

विजयाच्या संकल्पाची मशाल हृदयात करा प्रज्वलित

आ. मुनगंटीवार यांनी वाढवले खेळाडूंचे मनोबल

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 17 जानेवारी
प्रयत्न करणार्‍याला कधीही अपयश येत नाही. त्यामुळे आयुष्याच्या या स्पर्धेत आपल्या हृदयात प्रयत्नांची मशाल तेवत ठेवा. विजयाच्या संकल्पाची मशाल प्रज्वलित करा. त्यानंतर जगातील कुठलीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही, या शब्दांत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी खेळाडूंचे मनोबल वाढवले.
येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारा आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आयटीआयचे (आयएमसी) अध्यक्ष सी. एम. राव, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोनगीरवार, प्राचार्य वानखेडे, क्रीडा अधिकारी आवारे, स्टेट बँकेचे अधिकारी पवनकर, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे आदींची उपस्थिती होती.
मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये शक्ती, गुण, कौशल्य आहे. पण त्या गुणांना प्रयत्नांची जोड द्यावी लागेल. एखादे बीज आलमारीत ठेवले तर त्याचे झाड होत नाही. तेच बीज जमिनीत पेरले आणि त्याला खतपाणी दिले तर त्याचे झाड होते. आपल्या हृदयातही बीज आहे. पण, त्याचा वृक्ष करण्यासाठी प्रयत्नांचे खतपाणी द्यावे लागेल.

📍स्टेडियम बांधून पदक मिळणार नाही

आपल्या येथील खेळाडूंमध्ये क्षमता कमी नाही. पण, व्यवस्थेची उणीव होती आणि म्हणूनच इनडोअर स्टेडियम करतोय. म्हाडामध्ये 16 एकर जागा मिळाली आहे. याठिकाणी वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने स्टेडियम तयार होत आहे. पण, स्टेडियम बांधून पदक मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, असे आवाहनही आ. मुनगंटीवार यांनी केले.