नेरळ: रस्ता सुरक्षा अभियान – २०२५ अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
नेरळ:-विदया मंदिर मंडळ संचालित मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस कला आणि वाणिज्य महाविद्यालय ममदापु-नेरळ येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दिनांक १५ ते १७ जानेवारी रोजी रस्ता सुरक्षा अभियान – २०२५ अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न झाले.
दिनांक १७ रोजी नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नरेश नांदगावकर आणि त्यांच्या पोलीस सहकारी पल्लवी माने यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी वाहन चालविताना मोबाईल फोन वापरू नये तसेच वाहन चालविताना हेल्मेट वापरावे असे आवाहन केले. वाहतूक नियम मोडल्यावर किती दंड भरावा लागतो याची कल्पना विद्यार्थ्यांना देण्यात आली.
पोलीस भरती साठी कशी तयारी करावी या बाबत पल्लवी माने यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना कमी खर्चामध्ये वाहन चालक परवाना मिळावा याकरिता
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार इंगळे यांनी पोलीस उपनिरीक्षक नांदगावकर यांना विनंती केली व त्याला प्रतिसाद म्हणून विद्यार्थ्यांना कमी खर्चात आणि जलद लायसन्स मिळावे यासाठी येत्या काही दिवसांमध्ये महाविद्यालयात RTO चे कॅम्प लावण्याचे निवेदन देण्यात येईल असे सांगण्यात आले.
रस्ते सुरक्षा या विषयावर वत्कृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन हे महाविद्यालयातील प्रा. सागर मोहिते, प्रा. संतोष तुरुकमाने, प्रा. अमोल सोनवणे, प्रा. सोनम गुप्ता, प्रा. अनंत घरत, प्रा. विकास घारे, प्रा. वैभव बोराडे,प्रा. ईश्वरी शिरूर, प्रा. धनंजय कोटंगले, प्रा.पद्माकर फर्डे तसेच सौ. आरती आवटे, श्री. दिपक जोशी, श्री.रवींद्र मगरे, श्री. नामदेव निरगुडा, पुष्पा मावशी यांच्याकडून करण्यात आले.