तब्बल 35 वर्षांनी माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा जागवल्या शाळेच्या आठवणी
स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सुखदुःखात एकमेकांना सहकार्य करण्याचा केला निर्धार
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: माध्यमिक विद्यामंदिर फोफरीच्या 1989 च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या शाळेच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. गेल्या चार वर्षापासून हे बालमित्र वर्षातून एकदा आपलं बालपण जागत आहेत. शिक्षण घेतल्यानंतर गेल्या अनेक वर्ष आपापल्या क्षेत्रामध्ये वावरत असताना आपल्या शाळेतील शिक्षण घेतलेल्या मित्र-मैत्रिणींना एकत्र करण्याची संकल्पना मनात धरून एम व्ही एम फोफेरी इयत्ता दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थी विद्यार्थिनीं यांनी तब्बल 35 वर्षांनी पुन्हा एकत्र येत धीरज कॉटेज भुवनेश्वर येथे स्नेहसंमेलन साजरा केला. यावर्षी येथे सर्वजण एकत्र आल्या नंतर आपल्या व्यवसाय, कुटुंबावर सविस्तर माहिती दिली. तर बालपणी शाळेत झालेल्या घडामोडींना उजाळा दिला.
सुरवातीस शाळेतील विद्यार्थी शहीद सुयोग कांबळे यास श्रद्धांजली वाहण्यात आली तदनंतर तन्वी तांडेल, प्रथा पाटील, प्रज्योत नागावकर, तिर्था पाटील,साई मोकल, श्रीयोग पाटील, जान्हवी म्हात्रे या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सदस्यांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले
या वेळी शिक्षक रमाकांत नागावकर, आशाबाई, राजेंद्र नागावकर या शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच ॲड.रत्नाकर पाटील, नरेंद्र मोकल,धनंजय मोकल यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गावंड,व सहकार्य विश्वास मोकल,नितीन मोकल,गणेश म्हात्रे यांनी केले.
या गेट-टुगेदर मध्ये आपण सर्व मित्र-मैत्रिणींच्या सुख- दुःखात सहभागी होऊन सहकार्य करण्या बाबत चर्चा करण्यात आली. या स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्रपणे बालपणीच्या शाळेतील आठवणींना उजाळा देत येणाऱ्या काळात अशाच पद्धतीने दरवर्षी स्नेहसंमेलन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
दुपारच्या सत्रात खेळ पैठणीचा,संगीतखुर्ची,
स्मरणशक्ती व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी . एकनाथ पाटील, विश्वास ठाकूर,तुकाराम म्हात्रे, संदेश गोठणकर, दिलीप पाटील, रवींद्र म्हात्रे, विलास गावंड, विजय गावंड, रमाकांत म्हात्रे, संतोष पाटील, विजय म्हात्रे, भरत पाटील, विवेक पाटील,नितीन भगत,किरण आचरेकर,नवनाथ पाटील ,अंजली तांडेल, संजीवनी म्हात्रे, अंजली केळकर, वैजयंती ठाकूर, प्रार्थना नागावकर, आशा म्हात्रे, लक्ष्मी पाटील, नेहा पाटील, तृप्ती म्हात्रे, पूजा पाटील व इतर सदस्य उपस्थित होते.