हिंगणघाट नगर पालिकेचा अतिक्रमण हटावचा धडाका सुरू

66

हिंगणघाट नगर पालिकेचा अतिक्रमण हटावचा धडाका सुरू

हिंगणघाट नगर पालिकेने सुरू केलेल्या शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत शुक्रवार पासुन सुरवात झाली. विठोबा चौक पासुन कारंजा चौका पर्यंत परिसरातील सुमारे शेकडो हून अधिक दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले.

 Hinganghat Municipality's encroachment removal campaign begins
मुकेश चौधरी प्रतीनिधी

हिंगणघाट:- नगर पालिकेने सुरू केलेल्या शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत शुक्रवारी विठोबा चौक पासुन ते कारंजा चौका पर्यंतच्या परिसरातील सुमारे शेकडो हून अधिक दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले.

हिंगणघाट मध्ये काल पासुन अतिक्रमण हटाव मोहिम सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला हिंगणघाट नगर पालिका समोरील परीसर विठोबा चौक ते सुभाष चौक या परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर मोहता चौक ते कारंजा चौक या रस्त्यावरील सुमारे शेकडो हुण अधिक दुकाना समोरील अतिक्रमण काढण्यात आले.

याठिकाणी असलेले हॉटेल, पानटपरी, कापड दुकाण, किराणा दुकान, हार्डवेअर दुकाना समोरील अतिक्रमण काढण्यात आले. अनेक दुकानाच्या पुढे असलेली सर्व शेडही जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी काही व्यवसायिकांनी अतिक्रमण काढण्यास मुदत मागितली परंतु; अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न देता ही मोहीम सुरूच ठेवली. या मोहिमेत एक जेसीबी, 2 डझनच्या वर कर्मचाऱ्यांसह पेालिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.